esakal | "बिटकोत सर्व उपचार एका छताखाली" : पालकमंत्री छगन भुजबळ
sakal

बोलून बातमी शोधा

Bytco hospital all treatment under one roof says chhagan bhujbal nashik marathi news

पालकमंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी (ता. ११) नाशिक रोडला महापालिकेच्या बिटको रुग्णालयाची पाहणी केली.

"बिटकोत सर्व उपचार एका छताखाली" : पालकमंत्री छगन भुजबळ

sakal_logo
By
अंबादास शिंदे

नाशिक : मुंबई येथील केईएम रुग्णालयाच्या धर्तीवर बिटको रुग्णालयात एकाच छताखाली सर्व आजारांचे निदान होईल, अशा सुविधा निर्माण करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या नियोजनाचे निर्देश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले. 

बिटको रुग्णालयाची पाहणी

पालकमंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी (ता. ११) नाशिक रोडला महापालिकेच्या बिटको रुग्णालयाची पाहणी केली. आरोग्य उपसंचालक मल्लिकार्जुन पट्टणशेट्टी, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण आष्टीकर, आरोग्याधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, नोडल अधिकारी डॉ. आवेश पलोड, माजी खासदार समीर भुजबळ, डॉ. जितेंद्र धनेश्वर, निवृत्ती अरिंगळे, नगरसेवक जगदीश पवार आदी उपस्थित होते. भुजबळ यांनी आरोग्य यंत्रणा सक्षम होण्यासाठी कोविडव्यतिरिक्त कायमस्वरूपी विविध आजारांवर उपचारासाठी हे रुग्णालय असेल. ज्यात, शस्त्रक्रिया, आधुनिक वैद्यकीय तपासणीची सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या. तसेच, बिटको रुग्णालयातील कोविड केअर सेंटरसाठी उपलब्ध वैद्यकीय सुविधा, रेडिओलॉजी, रुग्णांची सेवा करण्यासाठी असलेले सुयोग्य मनुष्यबळ नियोजन, तत्पर डॉक्टर, परिचारिकांच्या कामकाज पद्धतीबाबत  भुजबळ यांनी समाधन व्यक्त केले. 

हेही वाचा > हाउज द जोश : 69 वर्षीय 'आजी'ने हरिहर किल्ला केला सर; तोही अवघ्या चार तासांत! पाहा VIDEO


१९ लिटरची टाकी 

कोविड रुग्णांना ऑक्सिजन पुरवठ्यासाठी बिटको रुग्णालयात १९ किलो लिटर ऑक्सिजनसाठा असलेली सर्वांत मोठी टाकी बसविण्यात आली आहे. बिटको रुग्णालयात १०० ऑक्सिजन बेड सुरू असून, ५० बेड तयार आहेत. याव्यतिरिक्त नव्याने २०० बेड उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती रुग्णालयातर्फे देण्यात आली.

हेही वाचा > अशी ही माणुसकी! रस्त्यात सापडलेले पन्नास हजार केले परत; प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक