ओझर ग्रामपंचायतीची वसुलीसाठी धडक मोहीम; आठ गाळे सील, चार लाख दहा हजारांची वसुली  

ozar vasuli.jpg
ozar vasuli.jpg

ओझर (नाशिक) : थकबाकी वसुलीसाठी ओझर ग्रामपंचायतीने कडक धोरण स्वीकारत थकबाकी न भरणाऱ्या आठ गाळेधारकांचे गाळे सील केले. ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या सक्तीच्या वसुलीमुळे थकबाकीदारांनी तत्काळ चार लाख दहा हजार रुपये भरले. 

पंधरा दिवसांपूर्वी नोटिसा
येथील वाढत चाललेल्या थकबाकीमुळे ३७ गाळेधारकांना येथील ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय देवकर यांनी पंधरा दिवसांपूर्वी नोटिसा बजावल्या. त्यास २९ जणांनी सकारात्मक प्रतिसाद देत रकमा जमा केल्या असता उरलेल्या आठ जणांवर नोटिशीची मुदत संपल्यावरही थकबाकी न भरल्याने ग्रामविकास अधिकारी देवकर यांनी थेट कारवाईचा बडगा उगारत मटण मार्केट येथील पाच, प्रियदर्शनी येथील एक, तर खंडेराव मंदिराजवळील दोन अशा आठ गळ्यांना सील केले. या वेळी काही भाडेकरूंची प्रशासनाबरोबर बाचाबाची झाली. त्यानंतर सील झालेल्या दुकानदारांनी एकूण चार लाख दहा हजार रुपये आणून भरले. कारवाईत सुभाष शेजवळ, दिलीप ठुबे, संतोष सोनवणे, योगेश गोरे, तुकाराम गवळी, सतीश सोनवणे यांच्यासह ग्रामपालिका कर्मचारी सहभागी झाले होते. 

मार्चअखेरीस कोरोना लॉकडाउन झाल्यानंतर ग्रामपालिकेची आर्थिक स्थिती त्या वेळी केलेल्या उपाययोजनामुळे काहीशी बिघडली. उत्पन्नाचे स्रोत असतानाही अनेक लोक थकबाकी भरण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे काही दिवसांत पाणी आणि घरपट्टी वसुलीसाठीही अशीच मोहीम हाती घेणार आहे. - दत्तात्रय देवकर, ग्रामविकास अधिकारी, ओझर 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com