esakal | विवाह समारंभाला आलेल्या कुटुंबियांना बनविला निशाणा! दहा लाखांहून अधिक ऐवज लंपास
sakal

बोलून बातमी शोधा

wedding 1.jpg

साठफुटी रस्त्यावरील अचल रॉयल अपार्टमेंटमधील गणेश बाठिया यांचे कुटुंबीय विवाह समारंभाला गेले होते. हीच संधी साधून चोरट्यांनी हात साफ केला आहे.

विवाह समारंभाला आलेल्या कुटुंबियांना बनविला निशाणा! दहा लाखांहून अधिक ऐवज लंपास

sakal_logo
By
प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : साठफुटी रस्त्यावरील अचल रॉयल अपार्टमेंटमधील गणेश बाठिया यांचे कुटुंबीय विवाह समारंभाला गेले होते. हीच संधी साधून चोरट्यांनी हात साफ केला आहे.

असा घडला प्रकार
साठफुटी रस्त्यावरील अचल रॉयल अपार्टमेंटमधील गणेश बाठिया यांचे कुटुंबीय विवाह समारंभाला गेले होते. हीच संधी साधून चोरट्यांनी बनावट चावीने बाठिया यांच्या फ्लॅटचा दरवाजा उघडून घरातील बॅगमधील सुमारे साडेपाच लाख रुपये व सोन्या-चांदीचे दागिने, महत्त्वाची कागदपत्रे असा सुमारे दहा लाखांहून अधिक ऐवज लंपास केला. कुटुंबातील एक सदस्य घरी परत आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

हेही वाचा > दुर्दैवी! शेतातील ती भातकापणी ठरली शेवटची; तरुण शेतकरीच्या बातमीने गाव हळहळले

२५ पेक्षा अधिक कुटुंबे वास्तव्याला असूनही घडला प्रकार

अचल रॉयल या अपार्टमेंटमध्ये २५ पेक्षा अधिक कुटुंबे वास्तव्याला असताना घरफोडी झाल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे. घरफोडीची माहिती मिळताच उपमहापौर नीलेश आहेर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कॅम्प पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलीस निरीक्षक दिगंबर पाटील व सहकारी घटनास्थळी दाखल झाले. पाठोपाठ स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी, कर्मचारीही दाखल झाले.

हेही वाचा > भररस्त्यात थरार! गळ्याला लावली तलवार आणि घेतले पाच लाख; नागरिकांत दहशत

भरदिवसा चोरी; दहा लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल लंपास

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी व अन्य माहितीची जमवाजमव सुरू केली आहे.  शहरातील साठफुटी रस्त्यावरील एका फ्लॅटमध्ये चोरट्यांनी भरदिवसा चोरी करत दहा लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 

go to top