ड्रायव्हिंग लायसन्ससाठी सारख्या चकरा मारताय? जिल्ह्यात लागणार नव्या वर्षात १५६ कॅम्प 

संतोष विंचू
Friday, 1 January 2021

कोरोना साथीच्या आजारामुळे काही महिने तालुकास्तरावर होणारे शिबिर काही काळासाठी स्थगित करण्यात आल्याने ग्रामीण भागातील जनतेची वाहनचालक परवान्याची कामे खोळंबली होती

येवला (जि. नाशिक) : वाहनचालक परवान्यासाठी नागरिकांना नाशिकला चकरा मारण्याची वेळ येऊ नये यासाठी नाशिकच्या प्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयातर्फे नव्या वर्षात १५६ शिबिरे घेण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील जनतेच्या सोयीसाठी तालुकास्तरावर शिबिरांचे आयोजन करण्यात येते. त्या अनुषंगाने नव्या वर्षासाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 

नव्या वर्षासाठी वेळापत्रक जाहीर
कोरोना साथीच्या आजारामुळे काही महिने तालुकास्तरावर होणारे शिबिर काही काळासाठी स्थगित करण्यात आल्याने ग्रामीण भागातील जनतेची वाहनचालक परवान्याची कामे खोळंबली होती. त्यामुळे होणारी गर्दी लक्षात घेऊन तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येक महिन्यातून दोनदा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. वाहन परवान्यासंदर्भातील कामे वेगाने होणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा - ह्रदयद्रावक! केवळ लेकरासाठीच मातेचे कष्ट अन् धडपड; नियतीचा घाला आला आणि सहा वर्षाचं लेकरू झालं पोरकं

शिकाऊ व पक्क्या अनुज्ञपतीचे कामकाज

शिबिर दौऱ्यात शिकाऊ व पक्क्या अनुज्ञपतीचे कामकाज करण्यात येणार असून, नागरिकांनी आपले अनुज्ञप्तीची कामे शिबिर कार्यक्रमात करून घ्यावीत, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय आहिरे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमंत हेमाडे यांनी केले आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या आठवड्यात पिंपळगावला, सिन्नर, येवला व निफाडला, तर दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात घोटी, लासलगाव, दिंडोरीत आणि चौथ्या आठवड्यात चांदवड, त्र्यंबकेश्वर, सुरगाण्यात शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. 

हेही वाचा - सरपंचपद भोगल्यानंतर भयाण वास्तवाचा सामना! माजी सरपंचांवर आज मजुरीची वेळ 

अशी होतील शिबिरे 
जानेवारी २०२१ : पिंपळगाव (४, १८ जानेवारी) सिन्नर (५, २०), येवला (७, २२), निफाड (८), घोटी (११), लासलगाव (१३), दिंडोरी (१५), चांदवड (२५), त्र्यंबकेश्वर (२७), सुरगाणा (२९). 

फेब्रुवारी २०२१ : पिंपळगाव (२, १६ फेब्रुवारी), सिन्नर (४, १८), येवला (५, २२), निफाड (८), घोटी (१०), लासलगाव (१२), वणी (१५), चांदवड (२३), त्र्यंबकेश्वर (२५), सुरगाणा (२६). 

मार्च २०२१ : पिंपळगाव (२, १७ मार्च), सिन्नर (४, १९), येवला (५, २२) निफाड (८), घोटी (१०), लासलगाव (१२), दिंडोरी (१५), चांदवड (२४), त्र्यंबकेश्वर (२६), सुरगाणा (३०). 

एप्रिल २०२१ : पिंपळगाव (१, १६ एप्रिल), सिन्नर (५, १९) येवला (६, २२), निफाड (७), घोटी (९), लासलगाव (१२), वणी (१५), चांदवड (२६), त्र्यंबकेश्वर (२८), सुरगाणा (३०). 

मे २०२१ : पिंपळगाव (३, १७ मे), सिन्नर (४, १९), येवला (६, २१), निफाड (७), घोटी (१०), लासलगाव (१२), दिंडोरी (१३), चांदवड (२४), त्र्यंबकेश्वर (२७), सुरगाण (२८). 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: camps in nashik district in new year for licenses nashik marathi news