ह्रदयद्रावक! बायको सोबतचा त्यांचा 'तो' प्रवास ठरला अखेरचा...काळाचा घाला असा की बायकोच

accident bike.jpg
accident bike.jpg
Updated on

नाशिक : (नाशिक रोड) नाशिक-पुणे महामार्गावरुन नाशिकरोडहुन सिन्नर फाट्याकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाजवळ रविवारी (ता.17) दुपारी भरधाव वेगाने जाणाऱ्या एका मारुती कारने दुचाकीस्वाराला धडक दिल्याने अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, यात दुचाकीचालक गंभीर जखमी झाला असून एक महिला ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

असा आहे प्रकार

नाशिकरोड येथील उड्डाणपूलावरून रविवार (ता.17) सिन्नरफाट्याच्या दिशेने दुचाकीवरून बीवायके वाणिज्य महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रसाद लक्ष्मण पागधरे हे त्यांच्या पत्नी नीता पागधरे यांना सोबत घेऊन मार्गस्थ होत होते. याचवेळी त्यांच्या पाठीमागून सिन्नरच्या दिशेने धावणाऱ्या एका अज्ञात अल्टो कारचालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत दुचाकीला कारने धडक दिली. या धडकेत पागधरे दाम्पत्य खाली कोसळले. धडक इतकी भीषण होती की, हे पती-पत्नी उड्डाणपूलावरून खाली जुना ओढा रस्त्यावर पडले. दरम्यान, नीता यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे बिटको रूग्णालयातील वैद्यकिय सुत्रांनी सांगितले. तसेच त्यांचे पती प्रसाद हेदेखील गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या अपघातानंतर अपघातस्थळावर न थांबता कारचालक नाशिक-पुणे महामार्गावरून भरधावरित्या फरार झाला आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, कार पोलिसांना देवळाली कॅम्पकडे जाणाऱ्या लॅमरोडवरील एका नाल्याजवळ आढळून आली आहे. पोलिसांनी सदरची कार जप्त केली असून कार चालकाच्या गाडीचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com