पालकांनो..तुमच्या मुलांकडे नायलॉन मांजा सापडला तर लक्षात ठेवा!

nylone manjha nsk.jpg
nylone manjha nsk.jpg
Updated on

नाशिक : नाशिकमध्ये एका महिलेचा नायलॉनच्या मांज्यामुळे गळा चिरला गेला. यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर नागरिकांच्या सतत मागणीमुळे प्रशासनही खडबडून जागे झाले आहे. अनेक जणांचा कर्दनकाळ ठरलेल्या नायलॉन मांजा वापराच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

आता थेट पालकांवर गुन्हा

नायलॉनच्या मांज्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. यामुळे मुलांकडे नायलॉनचा मांजा सापडल्यास मुलांच्या पालकांवर कारवाई केली जाणार आहे. पोलीस मुलांच्या पालकांवर गुन्हा दाखल करणार आहेत. यासंदर्भात नाशिक पोलिसांनी आदेश जारी केला आहे. राज्यात नायलॉन मांजावर बंदी असताना देखील सर्रासपणे नायलॉनच्या मांजाचा वापर सुरु आहे.

नाशिक पोलीसांचा आदेश

पतंगाचा मांजा अचानक त्यांच्या मानेला अडकल्याने भारती जाधव या तीव्र जखम झाल्या होत्या. यावेळी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, अतिरक्तस्त्राव आणि गळ्याची जखम मोठी असल्यानं उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यानंतर नायलॉनचा मांजा विक्री करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन त्यांना शिक्षा देण्याची मागणी जोर धरु लागली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com