esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

pathare.jpg

अत्यावश्‍यक सेवाचा फलक वाहनावर लावून कांदे आणि टरबूजच्या आडून त्यांनी बेकायदेशीररित्या काहीतरी दडवून ठेवलेल्याचे लक्षात येताच  पोलिसांनी वाहनाची झडती घेतल्यावर हा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणी वावी पोलिसांनी मालवाहतूक गाडी जप्त करत चालकासह एका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

धक्कादायक! टेम्पोवर बोर्ड अत्यावश्यक सेवेचा...अन् आतमध्ये मात्र भलतंच

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नाशिक : (वावी) अत्यावश्‍यक सेवाचा फलक वाहनावर लावून कांदे आणि टरबूजच्या आडून त्यांनी बेकायदेशीररित्या काहीतरी दडवून ठेवलेल्याचे लक्षात येताच  पोलिसांनी वाहनाची झडती घेतल्यावर हा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणी वावी पोलिसांनी मालवाहतूक गाडी जप्त करत चालकासह एका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

असा आहे प्रकार

संगमनेरहून मुंबईकडे टरबूज आणि कांदे घेऊन निघालेला टेम्पो (एमएच 03, सीपी 3682) पाथरे (ता. सिन्नर) येथे आला असता, वावी पोलिसांनी टेम्पोस अडवून तपासणी केली असता, पुढच्या भागात टरबूज आणि कांद्याच्या गोण्या आढळून आल्या. पोलिसांनी संपूर्ण गाडीची तपासणी केली असता, त्यांना त्यामध्ये एका बाजूला एक टन मांस मिळून आले. या मांसची बेकायदेशीररित्या वाहतूक केल्याप्रकरणी चालक गुलफान अन्सारी (वय 23) आणि सलाम मोहमद शेख (वय 22, रा. कुर्ला) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा > संचारबंदीतही 'ते' 'मालेगाव टू सिडको'?...अन् नातेवाईकांनीही दिला आसरा...कारवाई तर होणारच!

हेही वाचा > म्हाडाची नवनिर्मित घरे कोरोना रुग्णांसाठी उपयोगात आणली जातील - जिल्हाधिकारी

go to top