'एचएएल' मधील केंद्र सरकारचे १५ टक्के शेअर्स विक्रीला; तर्क-वितर्कांना उधाण

उत्तम गोसावी
Monday, 31 August 2020

या प्रणालीत एकूण तीन ब्रोकरमार्फत गुंतवणूकदारांना संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. बुधवारी याची जेव्हा घोषणा झाली तेव्हा एचएएलचा प्रतिशेअर अर्ध्या टक्क्याने वाढून पहिल्या दिवशीच्या ११७१.८५ वरून ११७७.७५ वर स्थिरावला. 

नाशिक : (ओझर) भारतीय संरक्षण क्षेत्रातील एचएएलमधील केंद्र सरकारच्या एकूण मालकीपैकी १५ टक्के भांडवल शेअर बाजारात विक्रीस काढल्यामुळे अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. केंद्र सरकारचा ८९.९७ टक्के भाग या कंपनीत आहे. प्रतिशेअरची मूळ किंमत १००१ रुपये ठेवण्यात आली आहे. याचा एकूणच किमतीत विचार केल्यास सुमारे पाच हजार कोटींची भर तिजोरीत पडेल, असा अंदाज आहे. 

तर्क-वितर्कांना उधाण 

सध्याच्या राफेल कराराच्या किमतीचा विचार केला तर शेअर्स विकून जी रक्कम हातात येईल ती राफेलच्या एकूण किमतीपेक्षा पाच टक्के खाली असेल. त्यामुळे अभ्यासकांनी याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. एचएएल ही कंपनी स्टॉक मार्केटमध्ये मार्च २०१८ मध्ये नोंदविण्यात आली होती. या प्रणालीत एकूण तीन ब्रोकरमार्फत गुंतवणूकदारांना संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. बुधवारी याची जेव्हा घोषणा झाली तेव्हा एचएएलचा प्रतिशेअर अर्ध्या टक्क्याने वाढून पहिल्या दिवशीच्या ११७१.८५ वरून ११७७.७५ वर स्थिरावला. 

हेही वाचा > गंभीर! १५ वर्षीय मुलीची बापा विरोधात तक्रार; वेळीच वाचा फोडली म्हणून प्रकार उजेडात

हा निर्णय केंद्र सरकारच्या वरिष्ठ पातळीवरचा असून, यात त्यांच्याकडे असलेल्या भांडवलाचा हिस्सा विकून ते तिजोरीत भर जरी घालत असले तरी याचा दूरगामी परिणाम काय व कसा होतो हा येणारा काळ सांगेल. राफेलनंतर सरकारचे कंपनीबद्दलचे धोरण आज जरी स्पष्ट दिसत नसले तरी ते फायद्याचे ठरावे इतकीच देशभरातील हजारो कामगारांना अपेक्षा आहे. 
- सचिन ढोमसे, सरचिटणीस, एचएएल कामगार संघटना, नाशिक  

हेही वाचा > एकीकडे गौराईनिमित्त स्त्रीशक्तीचा जागर; दुसरीकडे 'ती'च नकोशी? चिमुरड्या जीवाला शिक्षा कशासाठी?

संपादन - किशोरी वाघ

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The central government has for sale a 15 per cent stake in HAL nashik marathi news