गंभीर! १५ वर्षीय मुलीची बापा विरोधात तक्रार; वेळीच वाचा फोडली म्हणून प्रकार उजेडात

प्रमोद दंडगव्हाळ
Saturday, 29 August 2020

आजही आपल्याकडे लैंगिक शिक्षणबद्दल खुल्या मनाने चर्चा होत नाही. योग्य वयात लैंगिक शिक्षणाबरोबरच त्याचे फायदे आणि तोटे समजावून सांगितल्यास त्याची तीव्रता कमी होण्यास मदत होईल. यासाठी जनजागृती होणेही तितकेच गरजेचे आहे. हिंसक वृत्तीमुळे असे प्रकार वारंवार घडताना दिसतात. याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे, असाच एक प्रकार नाशिकच्या अंबड भागात घडलाय. येथे वेळीच वाचा फोडली म्हणून प्रकरण उजेडात आले.

नाशिक / सिडको : एखाद्या असह्य अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि नंतर बलात्कार करणे ही मानसिक विकृती आहे. बलात्कारामुळे अल्पवयीन मुली आणि स्त्रियांवर मानसिक आघात होतात.आणि त्या त्यांचा आत्मविश्वास गमावून बसतात. आजही आपल्याकडे लैंगिक शिक्षणबद्दल खुल्या मनाने चर्चा होत नाही. योग्य वयात लैंगिक शिक्षणाबरोबरच त्याचे फायदे आणि तोटे समजावून सांगितल्यास त्याची तीव्रता कमी होण्यास मदत होईल. यासाठी जनजागृती होणेही तितकेच गरजेचे आहे. हिंसक वृत्तीमुळे असे प्रकार वारंवार घडताना दिसतात. याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे, असाच एक प्रकार नाशिकच्या अंबड भागात घडलाय. येथे वेळीच वाचा फोडली म्हणून प्रकरण उजेडात आले.

असा घडला प्रकार

माऊली लॉन्स परिसरात राहणारा एक नराधम पिता आपल्या पंधरा वर्षाच्या मुलीचा गेल्या काही दिवसांपासून लैंगिक अत्याचार करत असल्याची बाब उघडकीस आली.  मागील अनेक दिवसांपासून तिचे लैंगिक शोषण सुरू होते. याबद्दल कोणाला सांगितले तर तुला मारून टाकेन अशी धमकी देत पीडित मुलीवर बलात्कार नराधम बाप करत होता. या भीतीपोटी पीडित मुलीने कोणाला काही सांगितले नाही. मात्र या घटने प्रकरणी येथील महिला सामाजिक कार्यकर्त्या मिनाक्षी जगदाळे यांनी या घटनेला वेळीच वाचा फोडण्याचे काम केल्याने हा प्रकार उजेडात येण्यास मदत झाली आहे.

हेही वाचा > वाद सोडवणे बेतले दोघा भावांंच्या जीवावर! पोलीस कॉन्स्टेबल ठरणार घटनेचे महत्वपूर्ण साक्षीदार; काय घडले नेमके?

सामाजिक कार्यकर्त्या मिनाक्षी जगदाळेंनी फोडली वाचा

जगदाळे यांच्या मदतीने पीडित मुलीला घेऊन थेट अंबड पोलिस ठाणे जाऊन सविस्तर माहिती पोलिसांना दिली. याप्रकरणी पोलिसांनी पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करून नराधम बापाला अटक केली. या घटनेचा तपास अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गवांदे या करीत आहेत.

हेही वाचा > घरभाड्याची मागणी करताच भाडेकरूने घरमालकासोबत केला "धक्कादायक" प्रकार! परिसरात खळबळ; काय घडले वाचा

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: father physically abuse to daughter nashik marathi news