एकीकडे गौराईनिमित्त स्त्रीशक्तीचा जागर; दुसरीकडे 'ती'च नकोशी? चिमुरड्या जीवाला शिक्षा कशासाठी?

प्रमोद सावंत
Saturday, 29 August 2020

एकीकडे गौराईचा सण उत्साहात साजरा केला जातोय. यानिमित्त स्त्रीजातीचा जागर करण्यात येतोय. असे असताना एका महिला तीन महिन्यांची मुलगी टाकून फरारी झाली. हा संतापजनक प्रकार मालेगावमध्ये समोर आलाय. 

नाशिक / मालेगाव :  एकीकडे गौराईचा सण उत्साहात साजरा केला जातोय. यानिमित्त स्त्रीजातीचा जागर करण्यात येतोय. असे असताना एका महिला तीन महिन्यांची मुलगी टाकून फरारी झाली. हा संतापजनक प्रकार मालेगावमध्ये समोर आलाय. 

चिमुरड्या जीवाला इतकी मोठी शिक्षा कशासाठी?
दुकानमालक मोहंमद सलीम अब्दुल सत्तार (वय ४२, रा. गुलशनाबाद) हे दुकानाच्या गाडीवरील सामान आवरत असतानाच दुकानात आलेल्या महिलेने नवजात बालिकेला सोडून पळ काढला. हा प्रकार मालकाच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांना ही माहिती कळविली. आझादनगर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. पोलिसांनी या चिमुकलीला सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे. मुलीच्या अंगावर बदामी रंगाचे स्वेटर आहे. पोलिस फरारी महिलेचा शोध घेत आहेत. महिन्यापूर्वी येसगाव शिवारात मक्याच्या शेतात दोन महिन्यांचा बालक बेवारस स्थितीत मिळून आला होता.  तीन महिन्याच्या चिमुरड्या जीवाला इतकी मोठी शिक्षा कशासाठी? असा प्रश्न अनेकांना पडलाय.  

हेही वाचा > वाद सोडवणे बेतले दोघा भावांंच्या जीवावर! पोलीस कॉन्स्टेबल ठरणार घटनेचे महत्वपूर्ण साक्षीदार; काय घडले नेमके?

हेही वाचा > घरभाड्याची मागणी करताच भाडेकरूने घरमालकासोबत केला "धक्कादायक" प्रकार! परिसरात खळबळ; काय घडले वाचा

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: unwanted newborn girl child left at shop nashik malegaon marathi news