सीईटी परीक्षा पुढील आदेशापर्यंत स्थगित; सीईटी सेलचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व बी. एस्सी (कृषी) या अभ्यासक्रमांची एमएचटी - सीईटी परीक्षा तसेच एलएलबी (पाच वर्षे) अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा स्थगित केली आहे. पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत सीईटी परीक्षेला स्थगिती दिली असून, सुधारीत वेळापत्रक जाहिर केले जाणार आहे. 

नाशिक : कोरोनाचा संसर्ग टाळण्याचा प्रयत्न केला जात असतांना संपूर्ण देश लॉकडाऊन केला आहे. या पार्श्वभुमीवर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष (सीईटी सेल) यांनीही महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व बी. एस्सी (कृषी) या अभ्यासक्रमांची एमएचटी - सीईटी परीक्षा तसेच एलएलबी (पाच वर्षे) 
अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा स्थगित केली आहे. पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत सीईटी परीक्षेला स्थगिती दिली असून, सुधारीत वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. 

परीक्षेसाठी राज्यभरातून 22 हजार 398 विद्यार्थी प्रविष्ठ

विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी सेलमार्फत प्रवेश परीक्षा घेतली. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करत परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते. तर इयत्ता बारावीनंतर विधी शाखेच्या पदवी अभ्यासक्रम असलेल्या एलएलबी (पाच वर्षे) या अभ्यासक्रमाची परीक्षा 12 एप्रिलला होणार होती. या परीक्षेसाठी राज्यभरातून 22 हजार 398 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. परंतु देशासह राज्यातील परिस्थिती लक्षात घेता या दोन्ही सीईटी परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय सीईटी सेलतर्फे घेतला आहे. या परीक्षांकरीताची सुधारीत तारीख, वेळापत्रक संकेतस्थळावरुन जाहीर केले जाणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. 

शिकवण्या बंदचा अभ्यासावर परीणाम 

बारावीची लेखी परीक्षा संपल्यानंतर विविध शिकवणी चालकांकडून सीईटी, जेईई 
या परीक्षांसाठी कॅश कोर्सचे नियोजन केले होते. या परीक्षांतील प्रश्न अकरावी, बारावीच्या अभ्यासक्रमातील असल्याने विषयांची उजळणी करण्याचे नियोजन या कोर्सद्वारे केले होते. मात्र शाळा, महाविद्यालयांसोबत खासगी शिकवण्यादेखील बंद झाल्याने या उजळणी अभ्यासावर परीणाम झाला आहे. तर दुसरीकडे विद्यार्थी घरी बसल्या अभ्यासावर भर देत आहेत. 

हेही वाचा> संचारबंदीत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत सुरू राहणार - छगन भुजबळ

मॉक टेस्टद्वारे सरावाची संधी

विद्यार्थ्यांना प्रश्न सोडविण्याचा सराव व्हावा, याकरीता सीईटी सेलमार्फत मॉक टेस्टचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. याद्वारे विद्यार्थी प्रश्न सोडविण्याचा जास्तीत जास्त सराव घरी बसून सहाय्याने ही मॉकटेस्ट देण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे.

हेही वाचा > ''कोरोना कळतो हो साहेब, पण या शेतमालाचं काय?''...शेतकऱ्यांची परिस्थितीशी झुंज सुरुच


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CET exam postponed till further order An updated schedule will obviously nashik marathi news