विद्यार्थ्यांनो काळजी नको! 'सीईटी' ऑनलाइन टेस्ट सिरीजने करा सराव; नोंदणी मोफत

सकाळ वृत्तसेवा
Monday, 5 October 2020

सर्व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी या परीक्षेला सामोरे जाताना खऱ्या परीक्षेला सामोरे जातोय या पद्धतीने तयारी करावी व त्यानंतर परीक्षा द्यावी. खरी अभियांत्रिकीची सीईटी परीक्षा दिल्याचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळेल. ​

नाशिक : संपूर्ण महाराष्ट्रातील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकी सीईटी परीक्षेचा सराव व्हावा, या उद्देशाने पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) व नूतन ग्रुपतर्फे ‘पीसीईटी नूतन-सीईटी ऑनलाइन टेस्ट सिरीज २०२०’ होणार आहे. येत्या ४, ६ आणि १० ऑक्टोबरला सकाळी दहाला तीन वेगवेगळ्या ऑनलाइन परीक्षा होणार आहेत. या परीक्षा मोफत असून, विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट व नूतन ग्रुपने केले आहे. 

या पद्धतीने तयारी करावी

ट्रेनिंग ॲन्ड प्लेसमेंट सेलचे अधिष्ठाता डॉ. शीतलकुमार रवंदळे यांनी सांगितले, की टेस्ट सिरीजचे प्रश्‍न व त्याचा पॅटर्न सीईटी व जेईई क्षेत्रांतील तज्ज्ञांनी तयार केला आहे. सर्व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी या परीक्षेला सामोरे जाताना खऱ्या परीक्षेला सामोरे जातोय या पद्धतीने तयारी करावी व त्यानंतर परीक्षा द्यावी. खरी अभियांत्रिकीची सीईटी परीक्षा दिल्याचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळेल. 

हेही वाचा > गुजरातहून औरंगाबादला पोहचवायचे होते 'घबाड'; पोलिसांच्या कारवाईने फिस्कटला प्लॅन

खालील लिंकवर ऑनलाइन पद्धतीने नोंदणी

‘पीसीईटी’चे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्‍वस्त हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, ‘पीसीसीओई’चे प्राचार्य डॉ. गजानन परिषवाड, ‘पीसीसीओई’चे प्राचार्य डॉ. हरिश तिवारी, ‘एनएमआयईटी’चे डॉ. ललितकुमार जाधव, डॉ. शीतलकुमार रवंदळे यांनी मार्गदर्शन केले. 
पीसीईटी नूतन-सीईटी ऑनलाइन टेस्ट सिरीज० २०२० या मोफत सीईटी टेस्ट सिरीजसाठी खालील लिंकवर ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करावी. www.Tinyurl.com/PCET-NUTAN-CET-TestSeries2020  

हेही वाचा > एक वाईनची बाटली पडली तब्बल सव्वा लाखाला; भामट्याने केले बॅँक खाते साफ

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CET Online Test Series Free nashik marathi news