'ती' चेहरा झाकून येते अन् दुसऱ्या महिलेचे सौभाग्याचं लेणं लुटते; महिला वर्गांमध्ये घबराट

दिगंबर पाटोळे
Monday, 8 February 2021

वणी येथील महिला वर्गांमध्ये सध्या घबराटीचे वातावरण निर्माण झालेे.कारण एका मागोमाग एक विपरित घटना येथे घडत आहेत. वणी पोलीस अनेक दुकानात जाऊन संबंधित ठिकाणचे व्हिडिओ चित्रीकरण तपासून पाहत आहेत. त्यातल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही ठिकाणी पुसट दुचाकीस्वाराचा चेहरा समोर आला आहे.

वणी (जि.नाशिक) :  वणी येथील महिला वर्गांमध्ये सध्या घबराटीचे वातावरण निर्माण झालेे.कारण एका मागोमाग एक विपरित घटना येथे घडत आहेत. वणी पोलीस अनेक दुकानात जाऊन संबंधित ठिकाणचे व्हिडिओ चित्रीकरण तपासून पाहत आहेत. त्यातल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही ठिकाणी पुसट दुचाकीस्वाराचा चेहरा समोर आला आहे.

सर्व प्रकार दुकानाच्या सीसीटिव्ही कॅमेर्‍यात कैद

वणी शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या शिवाजी रोड मार्गावरुन बालचंद खाबिया यांच्या पत्नी उज्वला बालचंद खाबिया हे दाम्पत्य रविवारी (ता.७)  दुपारी ३.४० वाजेच्या सुमारास घरी जात असतांना वणी मर्चंट बॅकेच्या समोर काळया रंगाच्या पल्सर दुचाकीवर हेल्मेट घातलेला चोरटा व एक चेहरा झाकलेली महिला होती. ते दोघेही त्यांच्या समोर येताच अचानक उज्वला खाबियाच्या यांच्या गळयातील चार तोळयांची सोन्याची पोत ओरबडुन त्यांनी पोबारा केला. यावेळी उज्वला खाबिया यांनी आरडाओरड करुन दुचाकीमागे धाव घेतली. यावेळी झालेली घटना परीसरातील दुकानदार नागरिकांना कळण्याच्या आतच चोरटे वेगाने पांचाळ गल्ली मार्गे पसार झाले. हा सर्व प्रकार रस्त्यांवरील असलेल्या दुकानाच्या कॅमेर्‍यात चित्रीत झाला.

हेही वाचा- रस्त्यावर फेकलेली 'नकोशी' झाली 'हवीशी'! नुकत्याच जन्मलेल्या शकुंतलाला मिळाले आई-बाबा

पुसट दुचाकीस्वाराचा चेहरा समोर

काळया रंगाच्या पल्सर दुचाकीवर हेल्मेट घातलेला चोरटा व एक चेहरा झाकलेली महिला होती. वणी पोलीस अनेक दुकानात जाऊन संबधित ठिकाणचे व्हिडिओ चित्रीकरण तपासून पाहत आहे. दुचाकीवरील चोरटे हे शिवनेरी चौकाकडुन भाजी मंडईच्या दिशेने गेले. वणी पोलीस तसेच स्थानिक गुन्हे शाखा ग्रामीण नाशिकचे पथक दाखल झाले असून सर्वत्र शोधाशोध सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेज काही ठिकाणी पुसट दुचाकीस्वाराचा चेहरा आला आहे.

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच

संशयितांमध्ये साम्य असल्याची प्राथमिक माहिती

मागील दोन महिन्यात अशाच सोनसाखळी चोरीच्या घटना कळवण, चांदवड येथे घडलेली असून या घटनेतील संशयितांमध्ये साम्य असल्याची प्राथमिक माहिती असून याही घटनांमध्ये काळ्या रंगाची पल्सर त्यावर एक पुरुष व महिला यांनी पोती ओरडल्या आहेत अशी माहीती आहे. याबाबत अधिक तपास वणी पोलीस ठाण्याचे सपोनि स्वप्निल राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.

शहरात एकच खळबळ

वणी येथील मध्यवस्तीत व बाजारपेठेत असलेल्या शिवाजी रोडवर दुचाकीवरुन महिलेसह आलेल्या अज्ञात चोरट्याने महिलेच्या गळ्यातील सुमारे चार तोळे सोन्याचे मनीमंगळसुत्र ओरबाडून पोबारा केल्याची घटना घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली असून महिला वर्गांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झालेे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chain snatching at vani nashik marathi news