esakal | रस्त्यावर फेकलेली 'नकोशी' झाली 'हवीशी'! नुकत्याच जन्मलेल्या शकुंतलाला मिळाले आई-बाबा
sakal

बोलून बातमी शोधा

new born baby

जगभरात मुली यशाची उंच शिखरे गाठत आहेत, तरी समाजात स्त्री भ्रूणहत्या, जन्मताच फेकून देणं असले अमानुष प्रकार काही थांबल्याचे दिसत नाही.. अशीच माणुसकीला लाज वाटायला लावेल अशी घटना सातपुर येथे समोर आली आहे. वाचा सविस्तर 

रस्त्यावर फेकलेली 'नकोशी' झाली 'हवीशी'! नुकत्याच जन्मलेल्या शकुंतलाला मिळाले आई-बाबा

sakal_logo
By
सतीश निकुंभ

सातपूर (नाशिक) : आजचा हा समाज कितीजरी पुढारलेला वाटत असेल तरी  काही बाबतीत मात्र तो अद्यापही मागसलेलाच आहे, आज जगभरात मुली यशाची उंच शिखरे गाठत आहेत, तरी समाजात स्त्री भ्रूणहत्या, जन्मताच फेकून देणं असले अमानुष प्रकार काही थांबल्याचे दिसत नाही.. अशीच माणुसकीला लाज वाटायला लावेल अशी घटना सातपुर येथे समोर आली आहे. वाचा सविस्तर 

फाशीचा डोंगर परिसरात रवींद्र पवार शनिवारी (ता.६) सकाळी साडेअकराला नेहमीप्रमाणे आपल्या पाळीव कुत्र्यासोबत फेरफटका मारण्यासाठी गेले होते. फिरत असताना त्यांना रस्त्याच्या कडेला लहान बाळाचा रडण्याचा आवाज आला. त्यांनी जवळ जाऊन बघितले असता, प्लॅस्टिकच्या गोणीत बाळाला कपड्यात गुंडाळून ठेवले होते. या घटनेमुळे सातपूर परिसरात एकच खळबळ उडाली.

वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी केलं नामकरण

त्यांनी तत्काळ आपल्या मित्रांना दूरध्वनी करून बाळास श्रमिकनगरमधील श्रीराम साई हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले. डॉ. मधुसूदन मोरे व डॉ. राकेश पवार यांनी बाळास तपासून प्रकृती उत्तम असल्याचे सांगितले. बाळाचे वजन दोन किलो ७०० ग्रॅम असून, बाळाला व्हीटामीन्स के डोसदेखील देण्यात आला. घटनेची माहिती मिळताच सातपूर ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर मोरे, भाजप युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष अमोल पाटील, मानव अधिकार संघाचे दिलीप पाटील यांनी घटनेची माहिती घेतली. निरीक्षक किशोर मोरे यांनी या मुलीचे शंकुतला, असे नाव ठेवले.

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच

अद्याप माणुसकी जीवंत आहे!

या बालिकेचे पालकत्व घेण्यास एका दांपत्याने पुढाकार घेतल्याने माणुसकी अजून जिवंत असल्याचा प्रत्यय आला. या बालिकेला दत्तक घेऊन सांभाळ करण्याची इच्छा गंगासागरनगर परिसरातील भाग्यश्री विलास तकाटे व विलास तकाटे यांनी दर्शवली. मुलीला टाकून जाणऱ्या अज्ञात मातेविरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करणार असून, अधिक तपास गंगापूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अंचल मुदगल करीत आहे. 

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल

go to top