लक्षणं सारखीच...कोरोना समजावा की व्हायरल?...अशी घ्या काळजी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

कोरोनाची लागण झाल्यानंतर प्रामुख्याने ताप, खोकला आणि श्‍वास घेण्यास त्रास ही लक्षणे असली, तरी सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे व्हायरल इन्फेक्‍शनचे रुग्ण वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्‍यता पावसाळ्यात अधिक निर्माण झाली आहे. याचे आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान आहे. 

नाशिक : कोरोनाची लागण झाल्यानंतर प्रामुख्याने ताप, खोकला आणि श्‍वास घेण्यास त्रास ही लक्षणे असली, तरी सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे व्हायरल इन्फेक्‍शनचे रुग्ण वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्‍यता पावसाळ्यात अधिक निर्माण झाली आहे. याचे आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान आहे. 

लक्षणेसारखी असल्याने रुग्ण ओळखणे कठीण 

दमा आणि कोरड्या खोकल्याचे रुग्ण कोरोना संशयित असल्याने, ते वेळीच लक्षात न आल्यास व्हायरल इन्फेक्‍शन रुग्णांच्या संपर्कात येण्याचा धोका वाढला आहे. पावसाळ्यातील वातावरण बदलामुळे ताप-थंडी, सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढतात, तर कोरोनाचेही या लक्षणांशी साधर्म्य आहे. त्यामुळे रुग्णालयात व्हायरल इन्फेक्‍शनच्या रुग्णांप्रमाणेच कोरोना संशयित रुग्णही येण्याची शक्‍यता आहे. अशा वेळी रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णास कोरडा खोकला, ताप आणि सर्दी नसताना श्‍वास घेण्यास त्रास होत असल्यास अशा रुग्णांना स्वतंत्र कक्षात नेऊन तपासणी करण्यासंदर्भातील निर्देश आरोग्य विभागाकडून देण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी सांगितले. शासकीय रुग्णालय, आरोग्य केंद्र वा खासगी रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांची लक्षणे ओळखून त्यांच्या नोंदी व उपचार करण्यासंदर्भातील निर्देश देण्यात आलेले आहेत. 

पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर

* पावसाळ्यात सर्दी, ताप, थंडी, खोकला अशा व्हायरल इन्फेक्‍शनचे रुग्ण वाढतात. 
* व्हायरल इन्फेक्‍शन रुग्णांना कोरडा खोकला येत नाही. 
* व्हायरल इन्फेक्‍शनमध्ये रुग्णांना पातळ सर्दी होते. 
* तसेच या सर्दीमुळे रुग्णांना श्‍वास घेण्यास त्रास होतो. 

या आहेत महत्त्वाच्या टिप्स 

* व्हायरल इन्फेक्‍शनमुळे रुग्णालयात गेल्यास दुसऱ्या रुग्णाशी संपर्क टाळावा. 
* मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. 
* पातळ सर्दी असेल तर व्हायरल इन्फेक्‍शन समजावे. 
* व्हायरल इन्फेक्‍शन असले तरी गरम पाणी प्यावे. 
* बाहेरील पाणी वा दूषित पाण्यापासून सावध राहावे. 

हेही वाचा > धक्कादायक! हॉटेलमध्ये पोलिसांची एंट्री होताच सुरु झाली पळापळ...नेमकं काय घडले?

मालेगावात कोरोनाचा प्रसार एप्रिलमध्ये शिगेला होता. त्यानंतर त्यात घट होत गेली, तर सध्या नाशिकमध्ये प्रसार वाढतो आहे. प्रसाराचा हा वेग जूनच्या अखेरपर्यंत कायम राहील, तर जुलैमध्ये यात घट होईल. प्रसार वाढत असताना त्याविरोधातील उपाययोजनाही तीव्र होतात आणि त्याचा परिणाम पुढच्या काही दिवसांत दिसून येऊन रुग्णसंख्या घटते. यावरून जुलैमध्ये जिल्ह्यात कोरोना आटोक्‍यात राहील अशी शक्‍यता आहे. - डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा शल्यचिकित्सक, नाशिक  

हेही वाचा > धक्कादायक! विवाहित महिलेची माहेरी गळफास घेऊन आत्महत्या...परिसरात खळबळ

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The challenge of viral infection with corona nashik marathi news