esakal | पाकिस्तानला खबरी देणाऱ्या दीपक शिरसाठचा उद्योग HAL ला पडणार महागात! सुरक्षेला मोठे आव्हान
sakal

बोलून बातमी शोधा

nashik ats action hal.jpg

ओझरच्या एचएएलमधील गोपनीय माहिती पाकिस्तानच्या आयएसआय संघटनेला पुरविण्याचा दीपक शिरसाठचा उद्योग एचएएल सुरक्षा यंत्रणेसाठी मोठे आव्हान आहे.

पाकिस्तानला खबरी देणाऱ्या दीपक शिरसाठचा उद्योग HAL ला पडणार महागात! सुरक्षेला मोठे आव्हान

sakal_logo
By
दीपक अहिरे

नाशिक / पिंपळगाव बसवंत : ओझरच्या एचएएलमधील गोपनीय माहिती पाकिस्तानच्या आयएसआय संघटनेला पुरविण्याचा दीपक शिरसाठचा उद्योग एचएएल सुरक्षा यंत्रणेसाठी मोठे आव्हान आहे. संशयित शिरसाठ याचा प्रशासनाशी अनेकदा वाद झाला असून, अकरा महिन्यांपासून त्याचे वेतन बंद होते. प्रतिबंधित क्षेत्रात कर्मचारी मोबाईलचा वापर करतातच कसा, असा भला मोठा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. 

दीपक शिरसाठच्या उद्योगाने एचएएलच्या सुरक्षेला आव्हान 
‘एचएएल’मध्ये सामान्य नागरिकांसाठी प्रवेश नाही. कर्मचाऱ्यांनाही कठोर नियमावली आहे. कामकाजाच्या ठिकाणी मोबाईल वापराला प्रतिबंध आहे. पण हे सगळे दुर्लक्षित राहिल्याने दीपक शिरसाठचे फावले. त्याने कोणती माहिती पुरविली, किती दिवसांपासून खबरीलाल माहिती देत होते, असे अनेक प्रश्‍न यानिमित्ताने पुढे आले आहेत. संशयित दीपक शिरसाठ मूळचा सिन्नर तालुक्यातील असून, २००७ पासून एचएएलमध्ये कार्यरत आहे. एकाच ठिकाणी काम करणाऱ्यांची ठराविक वर्षांनंतर बदली करण्याचा ‘एचएएल’चा नियम आहे. त्यानुसार शिरसाठची बदली वर्कशॉप ००६ विभागात वर्षभरापूर्वी करण्यात आली. त्या बदलीवरून शिरसाठने व्यवस्थापनाशी वाद घालत थयथयाट केला. 

हेही वाचा >  कैद्याची मास्कच्या नाडीने गळफास लावून आत्महत्या; नाशिक मध्यवर्ती कारागृहातील घटना

दीपकने वर्षभरपूर्वी आंदोलनही छेडले होते.

शिरसाठने बदली नाकारण्याचे कारणही नाजूक असल्याचे समजते. १४ महिन्यांपासून शिरसाठचा संघर्ष सुरू होता. बदली झालेल्या विभागात हजेरी नोंदवून शिरसाठ दिवसभर संवेदनशील ००६ वर्कशॉप विभागात वावरायचा, अशी चर्चा आहे. १४ महिन्यांपासून कर्तव्य बजावत नसल्याने व्यवस्थापनाने शिरसाठचा पगार बंद केला आहे. दिल्लीच्या मुख्य कार्यालयापर्यंत हा वाद गेल्याचे बोलले जाते. बदली व पगार रोखल्याच्या कारणावरून शिरसाठ एचएएलविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्याच्या तयारी होता. शिवाय वर्षभरपूर्वी आंदोलनही छेडले होते. दहा वर्षांपूर्वी कामगार संघटनेवर प्रतिनिधित्व करणाऱ्या शिरसाठवर पाकिस्तानचा खबरी बनण्याचा आरोप आहे.  

हेही वाचा > विनानोंदणी ऑक्सिजन पुरवठ्यातून नाशिकच्या सात कंपन्याचे पितळ उघड; कंपन्यांवर नियंत्रण कुणाचे?