कैद्याची मास्कच्या नाडीने गळफास लावून आत्महत्या; नाशिक मध्यवर्ती कारागृहातील घटना

विनोद बेदरकर
Thursday, 8 October 2020

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने मास्कच्या नाडीने गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेने कारागृह परिसरात खळबळ माजली आहे.

नाशिक : नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने मास्कच्या नाडीने गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेने कारागृह परिसरात खळबळ माजली आहे.

काही वर्षांपासून शिक्षा भोगत होता

कैद्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. अजगर अली मोहम्मद मुमताज मन्सुरी (३२) असे आत्महत्या करणाऱ्या मृत कैद्याचे नाव आहे. काही वर्षा पासून अजगर मन्सुरी कारागृहात शिक्षा भोगत होता. बुधवारी (ता.७) सकाळच्या सुमारास त्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. कैद्यांच्या बराकीत मास्कच्या नाडीचा वापर करून गळफास लावून घेतला होता. ही बाब लक्षात येताच कारागृह रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता त्यास मृत घोषीत करण्यात आले. 

हेही वाचा > दिघावकर साहेब लक्ष असू द्या! व्यापाऱ्याकडून धूळगावच्या शेतकऱ्यांची फसवणूक 

हेही वाचा > धर्मांतर घोषणेच्या वर्धापन दिनी मुक्तिभूमी राहणार सुनीसुनी! केवळ शासकीय पदाधिकारीच राहणार उपस्थित

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prisoner commits suicide at nashik jail marathi news