वरुणराजाची ‘गुड न्यूज’! उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता

महेंद्र महाजन
Monday, 3 August 2020

निसर्ग चक्रीवादळाच्या पट्ट्यात यंदाचा श्रावण कोरडा राहणार अशी स्थिती निर्माण झालेली असताना वरुणराजाची ‘गुड न्यूज’ मिळाली आहे. बंगालच्या उपसागरात वादळ तयार होत असल्याने उत्तर महाराष्ट्रात मंगळवारपासून तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता द्राक्ष बागायतदार संलग्न क्रॉपटेकच्या हवामान अभ्यासकांनी वर्तविली आहे, तसेच पश्‍चिम महाराष्ट्रात हलक्या पावसाचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.

नाशिक : निसर्ग चक्रीवादळाच्या पट्ट्यात यंदाचा श्रावण कोरडा राहणार अशी स्थिती निर्माण झालेली असताना रविवारी (ता. २) वरुणराजाची ‘गुड न्यूज’ मिळाली आहे. बंगालच्या उपसागरात वादळ तयार होत असल्याने उत्तर महाराष्ट्रात मंगळवार (ता. ४)पासून तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता द्राक्ष बागायतदार संलग्न क्रॉपटेकच्या हवामान अभ्यासकांनी वर्तविली आहे, तसेच पश्‍चिम महाराष्ट्रात हलक्या पावसाचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.

वरुणराजाची ‘गुड न्यूज’! उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता

अरबी समुद्र ते बंगालचा उपसागर या पट्ट्यातील मध्य भारतात जोरदार पावसाची चिन्हे दिसताहेत. त्यामध्ये गुजरात, मध्य प्रदेश, तेलंगणा, ओडिशा आणि मध्य महाराष्ट्राचा समावेश आहे. नाशिकचा पूर्व भाग, औरंगाबादचा काही भाग, नंदुरबार, जळगाव, धुळे, अमरावती या भागात शंभर ते दीडशे मिलिमीटर पावसाची शक्यता आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्राच्या कोकण पट्ट्यात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज याच अभ्यासकांचा आहे. त्यामुळे एकीकडे कोरोनाचे आणि दुसरीकडे पाणीटंचाईचे संकट गडद होत असताना, धरण क्षेत्रातील चांगल्या पावसाच्या अंदाजामुळे धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शहरांप्रमाणेच ग्रामीण जनतेला दिलासा मिळणार आहे. 

रिपोर्ट - महेंद्र महाजन

संपादन - ज्योती देवरे

हेही वाचा > अमानुष! रक्ताच्या थारोळ्यात घरात पडलेली पत्नी..बाहेरून दरवाजा लावून निर्दयी पती फरार ..थरारक घटना

हेही वाचा > सहा फुटांच्या खड्ड्यातून आली दुर्गंधी.. गावकऱ्यांना भलताच संशय....शोध घेताच गावात एकच खळबळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chance of heavy rains in North Maharashtra