PHOTOS : भीषण! अख्ख्या कुटुंबावर काळाची झडप...ट्रॅक्टरचा अक्षरश: चक्काचूर

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 6 June 2020

नव्याने घेतलेल्या जमिनीकडे अख्खं कुटुंब ट्रॅक्टरने जात असताना त्यांच्यावर काळाने झडप घातली. चांदवड तालुक्यातील पुरी येथील मधुकर शंकर भवर यांनी देवळाजवळ शेती घेतली आहे. या शेतीला पाहण्यासाठी भवर कुटुंबातील 9 जण एका ट्रॅक्टरवर जात होते. त्यावेळीच अख्ख्या कुटुंबावरच काळाचा घाला आला. अन् सर्वच उद्ध्वस्त झालं

नाशिक / चांदवड : चांदवड-देवळा मार्गावरील भावड घाटात आज दुपारी अज्ञात वाहनाने ट्रॅकटरला जबर धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील ४ जण ठार तर ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना मालेगावच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अख्खं कुटुंब ट्रॅक्टरने शेताकडे जात असतानाच...

नव्याने घेतलेल्या जमिनीकडे अख्खं कुटुंब ट्रॅक्टरने जात असताना त्यांच्यावर काळाने झडप घातली. चांदवड तालुक्यातील पुरी येथील मधुकर शंकर भवर यांनी देवळाजवळ शेती घेतली आहे. या शेतीला पाहण्यासाठी भवर कुटुंबातील 9 जण एका ट्रॅक्टरवर जात असताना भावडी घाटाजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने या ट्रॅक्टरला जबर धडक दिली.

हेही वाचा > ह्रदयद्रावक! "निसर्गा'ने केली आई-मुलाची ताटातूट...रात्रभर बछडा आईची वाट बघत होता

भीषण अपघात..

अपघात इतका भीषण होता की ट्रॅक्टरचा पुढचा भाग चक्काचूर झाला, तर ट्रॅक्टरवरील 9 पैकी 3 जणांचा जागीच तर एकाच उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून त्यात भवर यांचा मुलगा विजय, सुन सुनिता,नातू सोन्या आणि त्यांचे व्याही भाऊसाहेब काळे यांचा समावेश आहे. अपघातात जखमी झालेल्यावर देवळा येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना मालेगावच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दरम्यान, या प्रकरणी चांदवड पोलीस स्थानकात अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा > "पैसे नाही दिले..तर अंगावर थुंकून कोरोनाबाधित करेन..."अजब धमकीने त्याच्या पायाखालची सरकली जमीन!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chandwad tractor accident four killed six injured nashik marathi news