हॅलो..सैन्यदलातून बोलतोय..समोरून भामट्याने घातला असा गंडा..

fraud call.jpg
fraud call.jpg

नाशिक : फोनवरून एकाने आम्ही सैन्यदलात असून, आम्हाला तुमच्याकडील साहित्य खरेदी करायचे असल्याचे सांगून वस्तूच्या खरेदीपोटी आगाऊ पैसे देण्याची तयारी दर्शवीत मोबाईलवरील यूपीआय क्‍यूआर कोड मागविला. ​आणि मग...

असा घडला प्रकार

संतोष दगडू व्यवहारे (वय 30, रा. मखमलाबाद) यांनी सायबर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, गेल्या गुरुवारी (ता. 2) दुपारच्या सुमारास त्यांना फोन आला. त्यात, फोनवरून एकाने आम्ही सैन्यदलात असून, आम्हाला तुमच्याकडील साहित्य खरेदी करायचे असल्याचे सांगून वस्तूच्या खरेदीपोटी आगाऊ पैसे देण्याची तयारी दर्शवीत मोबाईलवरील यूपीआय क्‍यूआर कोड मागविला. व्यावसायिकांच्या यूपीआय कोडच्या आधारे बॅंक खात्यातून 67 हजार 500 रुपये काढल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. 
दुसऱ्या एका घटनेत अशाच प्रकारे भामट्यांनी अदिती फुलपगार यांची फसवणूक केली आहे. खात्यातून 23 हजार 900 रुपये चोरट्यांनी काढल्याचे त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. 

आणखी दोन प्रकरणे उघडकीस

सैन्यदलातून बोलत असल्याचे सांगून व्यावसायिकांना वस्तू खरेदीचे आमिष दाखवून फसवणुकीची आणखी दोन प्रकरणे समोर आली आहेत. यात 91 हजार 400 रुपयांची फसवणूक झालेली आहे. सैन्यदलाच्या नावाचा वापर करून फसवणुकीच्या घटना चिंतेत टाकणाऱ्या आहेत. पुणे कॅन्टान्मेंटमधून बोलत असल्याचे सांगत भामट्याने कोड स्कॅन करण्याची गळ घातली. यातून संबंधितांची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला. काही दिवसांपूर्वी व्यावसायिकाने सायबर पोलिस ठाण्यात फसवणूक झाल्याची तक्रार दिली होती. त्यात आणखी दोन प्रकरणे उघडकीस आली आहेत. 

भामट्यांचा मोबाईल सक्रिय 
फसवणूक केल्यानंतर संबंधितांकडून मोबाईल स्विचऑफ केला जात असल्याचे यापूर्वी अनुभवायला मिळायचे. परंतु या भामट्यांचा मोबाईल क्रमांक फसवणूक केल्यानंतरही सक्रिय असल्याचे एका तक्रारदाराने सांगितले. यापेक्षा अधिक धक्‍कादायक बाब म्हणजे फसवणूक करत काढलेल्या पैसे परत करण्याच्या मोबदल्यात आणखी पैसे मागण्यापर्यंत या भामट्यांची मजल गेली आहे. 


फसवणुकीच्या घटनांना बसावा आळा 
गेल्या काही महिन्यांपासून लॉकडाउनमुळे आधीच व्यवसाय व उलाढाल ठप्प होती. गेल्या काही दिवसांपासून अनलॉकमुळे व्यवहार पूर्वपदावर येत असताना भामट्यांकडून व्यावसायिकांना टार्गेट केले जात आहे. अशाच फसवणुकीच्या घटनांना आळा बसविण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com