शरद पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराच्या लग्नाला हजर; आज कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह!

sakal (62).jpg
sakal (62).jpg

नाशिक : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती खुद्द पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ट्विटरद्वारे दिली. पण आश्चर्याची बाब म्हणजे, भुजबळ यांनी एक दिवसापूर्वीच रविवारी (ता.२१) राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराच्या विवाहसोहळ्याला हजेरी लावली होती. सोबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेही त्या ठिकाणी उपस्थित होते.

साहित्य संमेलन आणि कोरोना आढावा बैठकीलाही उपस्थिती

'माझी करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन तीन दिवसात माझ्या संपर्कात अलेल्या सर्वांनी आपली करोना टेस्ट करून घ्यावी. माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही. करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. मास्क आणि सॅनिटायझरचा नियमित वापर करा,' असं छगन भुजबळ यांनी ट्विटरमध्ये म्हटलं आहे. तसेच भुजबळ यांनी रविवारी साहित्य संमेलन आणि कोरोना आढावा बैठकीला उपस्थिती लावली होती. तसेच, देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांच्या विवाह सोहळ्यालाही ते उपस्थित होते. त्यांच्यासोबत शरद पवारांसह राष्ट्रवादीचे अनेक नेते व पदाधिकारी होते. त्यामुळे चिंता वाढली आहे.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com