भुजबळांची एक प्रतिक्रिया.. अन् ७ ते ८ क्वार्टरचं टार्गेट ठेवलेल्याला मिळाला मोठा दिलासा!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 5 May 2020

राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तसेच नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमधील दारु दुकानं सुरु करण्याबाबत एक प्रतिक्रिया दिली. या प्रतिक्रियेमुळे नाशिकमधील तळीराम आणि विशेषत: ७ ते ८ क्वार्टर रिचवण्याचं टार्गेट ठेवलेल्या तळीरामाला तर मोठाच दिलासा मिळाला असंच म्हणावं लागेल.

नाशिक : "नाशिकमध्ये प्रत्येक दुकानदाराकडून हमीपत्र घेऊन सर्व नियम पाळण्याची हमी घेऊ आणि त्यानंतर दुकानं उघडण्यासाठी परवानगी देण्यात येईल.. तसेच बेशिस्त राहिलात तर दुकानं सुरु होणार नाहीत त्यामुळे नियम पाळायलाच हवेत. दुकानांच म्हटलं तर कधी ना कधी ती सुरु होणारच आहेत, कोणी आज करेल कोणी उद्या.." असे राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तसेच नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमधील दारु दुकानं  सुरु करण्याबाबत एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली. या प्रतिक्रियेमुळे नाशिकमधील तळीराम आणि विशेषत: ७ ते ८ क्वार्टर रिचवण्याचं टार्गेट ठेवलेल्या तळीरामाला तर मोठाच दिलासा मिळाला असंच म्हणावं लागेल.

"सोशल डिस्टन्सिंग पाळाल तरच दुकानं करू सुरू"

नाशिकमध्ये काल (ता.४)  दारुच्या दुकानांबाहेर मद्यप्रेमींची गर्दी वाढल्याने शहरातील सर्व वाईन शॉप बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारींकडून देण्यात आले होते.  मात्र दुकानचालकांकडून हमी घेऊन, सर्व नियमांच्या अटीवर दुकानं उघडण्याची परवानगी देऊ, अशी माहिती छगन भुजबळ यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला दिली.. तसेच आता प्रत्येक दुकानदारांकडून हमीपत्र घेणार आहोत. सोशल डिस्टन्सिंग पाळतील, मास्क वापरतील आणि शांतता राखली जाईल, अशी हमी दुकानदारांकडून घेण्यात येईल. त्यानंतर परवागनी देण्यात येईल. सरकारनेच दुकानं सुरु करण्यासाठी सांगितलं आहे, त्यामुळे ही दुकानं आज ना उद्या सुरु होणारच आहेत. फक्त नियम पाळावे लागणार आहेत. अनेक जिल्ह्यात सुरु झाले आणि बंदही झाले. मात्र ही दुकानं कधी ना कधी सुरु होणारच आहेत. या अटी शर्ती यापुढे लागू राहतील, असं छगन भुजबळ म्हणाले.

हेही वाचा > पोल्ट्री फार्मवर सकाळी गेलेला युवक रात्री परतलाच नाही..भावाने फार्मच्या फटीतून पाहिले तर धक्काच!

हेही वाचा > ओढणीचा झोका बेतला चिमुरड्याच्या जीवावर...मुलाची अवस्था पाहून आईने फोडला हंबरडा​

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chhagan Bhujbal reaction on opening nashik wine shops nashik marathi news