"राज्यात 39 रेशन दुकानदारांवर गुन्हे अन्‌ 48 दुकानांचे परवाने रद्द" 

सकाळ वृत्तसेवा 
Friday, 24 April 2020

नागपूर महसूल विभागात याप्रकरणी पाच गुन्हे नोंदवण्यात आले असून, 18 दुकानांचे परवाने निलंबित व एक परवाना रद्द करण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक 11, तर वर्ध्यामध्ये चार दुकानांवर कारवाई केली. चंद्रपूरमध्ये चार गुन्हे दाखल असून, नागपूर शहरातील दुकानाचा परवाना रद्द केला.

नाशिक : रेशन धान्य वाटपातील अनियमितता, नियमांचे पालन न केल्याने राज्यातील 39 रेशन दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 87 रेशन दुकानांचे परवाने निलंबित केले, तर 48 रेशन दुकानांचे परवाने रद्द केले. यापुढेही रेशन दुकानांमध्ये काळाबाजार, कमी धान्य देणे, अधिक पैसे घेणे अशा तक्रारी आल्यास कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे अन्न-नागरीपुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दिली. 

छगन भुजबळ - 48 दुकानांचे परवाने रद्द 
नागपूर महसूल विभागात याप्रकरणी पाच गुन्हे नोंदवण्यात आले असून, 18 दुकानांचे परवाने निलंबित व एक परवाना रद्द करण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक 11, तर वर्ध्यामध्ये चार दुकानांवर कारवाई केली. चंद्रपूरमध्ये चार गुन्हे दाखल असून, नागपूर शहरातील दुकानाचा परवाना रद्द केला.

इतर विभागनिहाय कारवाई अशी

-अमरावती- पाच गुन्हे दाखल, सात परवाने निलंबित आणि 13 परवाने रद्द. अकोल्यामध्ये तीन परवाने निलंबित आणि वाशीममध्ये पाच परवाने रद्द. बुलढाणामध्ये चार परवाने रद्द. अमरावती आणि अकोल्यात प्रत्येकी दोन व बुलढाण्यात एक गुन्हा दाखल.

-औरंगाबाद - 29 परवाना निलंबित. चार परवाने रद्द करण्यात आले आहेत. बीडमध्ये 12, उस्मानाबादमध्ये पाच परवाने निलंबित.

-जालना आणि बीड जिल्ह्यांत प्रत्येकी दोन परवाने रद्द.

-पुणे - चार गुन्हे नोंदवले. 17 परवाने निलंबन आणि 14 परवाने रद्द. पुणे जिल्ह्यात 11 दुकानांचे निलंबन आणि तीन दुकानदारांवर गुन्हा दाखल. कोल्हापूरमध्ये आठ परवाने रद्द.

-कोकण विभागात नऊ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. सात परवाने निलंबित करत एक परवाना रद्द करण्यात आला.

-ठाणे जिल्ह्यातील चार परवाने निलंबित करून चार गुन्हे दाखल करण्यात आलेत.

-रत्नागिरीतील एक परवाना रद्द करत रायगडमध्ये तीन दुकानदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला, असेही भुजबळ यांनी सांगितले. 

हेही वाचा > धक्कादायक! "पुढच्या जन्मी आपण एकाच आईच्या पोटी जन्म घेऊ"..चिठ्ठीत कोरोनाची भीती अन्‌ नैराश्‍य ​

16 दुकानदारांवर गुन्हा दाखल 
नाशिक विभागात 16 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. नऊ परवाने निलंबित करत 15 परवाने रद्द करण्यात आले. नाशिक व जळगाव जिल्ह्यांत प्रत्येकी तीन दुकानांचे परवाने निलंबित केले. जळगावमध्ये सात आणि नाशिकमध्ये चार परवाना रद्द केले. नगर व जळगाव जिल्ह्यांत प्रत्येकी सात रेशन दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

. "लॉकडाउन'च्या काळात वाढीव थाळीचा लाभ
शिवभोजन थाळीच्या संख्येत 50 हजारांची वाढ करण्यात आली आहे. आता राज्यात रोज दीड लाख थाळ्यांचे वितरण होईल. "लॉकडाउन'मध्ये गरीब उपाशी राहू नये, म्हणून 28 मार्चपासून शिवभोजन थाळी प्रकल्पाचा तालुकास्तरावर विस्तार करण्यात आला. रोज सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेत पाच रुपयांना थाळी मिळते. "लॉकडाउन'च्या काळात वाढीव थाळीचा लाभ घेता येईल. - छगन भुजबळ (अन्न व नागरीपुरवठामंत्री) 

हेही वाचा > एक सुशिक्षित डॉक्टर अन् तान्ह्या जुळ्या मुलांची आई आणि आत्महत्या??? गूढ काय?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chhagan bhujbal said about action against ration shopkeepers in the state and revocation of licenses of shops nashik marathi news