esakal | "देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्याच आदेशाचा विसर" - भुजबळ
sakal

बोलून बातमी शोधा

bhujbal and fadanavis.jpg

आरोप करणे हे विरोधी पक्षाचे कामच आहे.फडणवीस फिरत आहेत, ही चांगली बाब आहे. कोरोनाशी मुकाबला करताना काही कमतरता त्यांना जाणवत असतील तर ती त्यांनी निदर्शनास आणून द्यावी. परंतु, ते मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात घेतलेल्या आपल्याच निर्णयाचे उल्लंघन करत असल्याचा आरोप भुजबळांनी केला.

"देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्याच आदेशाचा विसर" - भुजबळ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : आरोप करणे हे विरोधी पक्षाचे कामच आहे.फडणवीस फिरत आहेत, ही चांगली बाब आहे. कोरोनाशी मुकाबला करताना काही कमतरता त्यांना जाणवत असतील तर ती त्यांनी निदर्शनास आणून द्यावी. परंतु, ते मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात घेतलेल्या आपल्याच निर्णयाचे उल्लंघन करत असल्याचा आरोप भुजबळांनी केला.

त्यांनी स्वतःच्याच आदेशाचा विसर

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना, शासकीय अधिकाऱ्यांनी विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीला उपस्थित राहू नये, असा आदेश काढला होता. पण, आता त्यांनी स्वतःच्या आदेशाचे पालन करावे, असा टोला पालकमंत्री छगन भुजबळ यांनी लगावला.भुजबळ यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (ता. 10) झालेल्या कोरोना आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 

आरोप करणे हे विरोधी पक्षाचे कामच - भुजबळ
माजी मुख्यमंत्री फडणवीस यांचे राज्याच्या विविध भागात दौरे सुरू आहेत. नाशिकच्या दौऱ्यात त्यांनी "कोरोना संसर्गा'च्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर निशाणा साधताना महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप केला. तसेच शासकीय अधिकाऱ्यांची बैठकही घेतली. त्यामुळे फडणवीस राज्यात समांतर सरकार चालवत असल्याचा आरोप करीत, शिवसेनेच्या काही मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली. त्या अनुषंगाने तापलेल्या मुद्द्यावर भुजबळ म्हणाले, की आरोप करणे हे विरोधी पक्षाचे कामच आहे.फडणवीस फिरत आहेत, ही चांगली बाब आहे. कोरोनाशी मुकाबला करताना काही कमतरता त्यांना जाणवत असतील तर ती त्यांनी निदर्शनास आणून द्यावी. परंतु, ते मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात घेतलेल्या आपल्याच निर्णयाचे उल्लंघन करत असल्याचा आरोप भुजबळांनी केला.

हेही पाहा > VIDEO : जेव्हा सुनीता ताईंकडून नकळत झाले कोरोनाबाधित मृतदेहावर अंत्यसंस्कार...पाहा थरारक आपबिती.. 

फडणवीस त्यांच्या दौऱ्यात शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. शासकीय अधिकाऱ्यांनी विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकांना उपस्थित राहू नये, असा आदेश 2016 मध्ये फडणवीस यांनीच त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात काढले आहेत. मात्र, आता त्याच आदेशाचा त्यांना विसर पडलेला दिसतो. त्यामुळे त्यांनी आपल्या आदेशाचे पालन करावे, असा टोला भुजबळांनी लगावला. 

हेही वाचा >ह्रदयद्रावक! पुत्रवियोगाचा धक्का..अवघ्या अर्ध्या तासातच मातेचाही जगाचा निरोप.. गावात हळहळ