ह्रदयद्रावक! पुत्रवियोगाचा धक्का..अवघ्या अर्ध्या तासातच मातेचाही जगाचा निरोप.. गावात हळहळ

haji abdul and mother.jpg
haji abdul and mother.jpg

नाशिक / मालेगाव : हाजी अब्दुल रशीद यांना गेल्या सोमवारी हृदयविकाराने खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारा दरम्यान मंगळवारी रात्री त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने अवघ्या अर्धा तासातच आईने प्राण सोडले. पुत्रापाठोपाठ मातांनी निरोप घेतल्याने पुर्व भागात हळहळ व्यक्त होत आहे. काय घडले नेमके..

अवघ्या अर्धा तासातच मातेचा जगाचा निरोप...

मालेगावच्या आझादनगर भागातील हाजी अब्दुल रशीद यांना गेल्या सोमवारी हृदयविकाराने खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारा दरम्यान मंगळवारी रात्री त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने अवघ्या अर्धा तासातच त्यांच्या मातोश्री शमशादबी अब्दुल रज्जाक (वय 70) यांचेही निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे. माता पुत्रांवर बडा कब्रस्तानात एकाच वेळी दफनविधी झाला.

चटका लावणारे निधन
दिवंगत हाजी अब्दुल रशीद रज्जाक उर्फ राशनवाला (वय ५१) सर्वदूर परिचित कार्यकर्ते होते. 2018 मध्ये मुले पळविणारी टोळी आल्याच्या अफवा, आणि राईनपाडा (जि.धुळे) येथील घटनांच्या तणावाच्या काळात 1 जुलै 2018 ला स्वतचा व कुटुंबाचा जीव धोक्यात घालून अली अकबर हॉस्पिटलजवळ त्यांच्या निवासस्थानी जिंतुर तालुक्यातील गिऱ्हे परिवाराला त्यांच्या घरात आश्रय दिला होता. जमावाचा रोष पत्करत धाडसाने त्यांनी ही कामगिरी केली. यानंतर त्यांचा गौरव झाला होता. त्यांचे निधन राशनवाला परिवारासह अनेकांना चटका लावून गेले. त्यांच्या दफनविधीस महापौर ताहेरा शेख, माजी आमदार रशीद शेख, आसिफ शेख, जनता दलाचे नेते नगरसेवक मुश्‍तकीम डिग्निटी आदी उपस्थित होते.

गावात हळहळ व्यक्त

मालेगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते हाजी अब्दुल रशीद रज्जाक उर्फ राशनवाला (51) याचे हृदयविकाराच्या धक्क्याने 7 जुलैला निधन झाले. पाठाेपाठ पुत्र वियोगाचा धक्का सहन न झाल्याने या मातेचेही निधन झाले. पुत्रापाठोपाठ मातांनी निरोप घेतल्याने पुर्व भागात हळहळ व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com