दुबे कशानेही मरू दे, काय देणे-घेणे.. - भुजबळ

CHHAGAN BHUJBAL.jpg
CHHAGAN BHUJBAL.jpg

नाशिक : कुख्यात गुंड विकास दुबेचा एन्काउंटर वरून विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अनेकांनी एन्काउंटरविषयी अनेक प्रश्‍न उपस्थित केले आहे. त्याविषयी पालकमंत्री छगन भुजबळ यांना विचारले असता ते म्हणाले, की विकास दुबेबद्दल प्रेम वाटावे, अशी परिस्थिती नाही. असे लोक कोरोनाने गेले काय किंवा आणखी कशाने, काय फरक पडतो, असे सांगत पोलिसांची हत्या करणे हे चुकीचेच आहे. त्याचं एन्काउंटर खरं की खोट, हा तपासाचा भाग आहे. ते त्यांचे सरकार करेल. महाराष्ट्र सरकारकडे आला तर आम्ही करू, असा टोलाही त्यांनी लगावला भुजबळ यांनी लगावला.भुजबळ यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (ता. 10) झालेल्या कोरोना आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 

भुजबळांचा फडणवीसांना टोला
माजी मुख्यमंत्री फडणवीस यांचे राज्याच्या विविध भागात दौरे सुरू आहेत. नाशिकच्या दौऱ्यात त्यांनी "कोरोना संसर्गा'च्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर निशाणा साधताना महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप केला. तसेच शासकीय अधिकाऱ्यांची बैठकही घेतली. त्यामुळे फडणवीस राज्यात समांतर सरकार चालवत असल्याचा आरोप करीत, शिवसेनेच्या काही मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली.

त्या अनुषंगाने तापलेल्या मुद्द्यावर भुजबळ म्हणाले, की आरोप करणे हे विरोधी पक्षाचे कामच आहे.फडणवीस फिरत आहेत, ही चांगली बाब आहे. कोरोनाशी मुकाबला करताना काही कमतरता त्यांना जाणवत असतील तर ती त्यांनी निदर्शनास आणून द्यावी. परंतु, ते मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात घेतलेल्या आपल्याच निर्णयाचे उल्लंघन करत असल्याचा आरोप भुजबळांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com