Hinganghat Burn Case : "ही विकृत प्रवृत्ती खपवून घेतली जाणार नाही"

सकाळ वृत्तसेवा 
Monday, 10 February 2020

हिंगणघाट प्रकरणातील पीडित भगिनीची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली असून या भगिनींचे निधन मनाला चटका लावून जाणारे आहे. महाराष्ट्र हे माता भगिनींचा सन्मान करणारे राज्य असून समाजातील ही विकृत प्रवृत्ती खपवून घेतली जाणार नाही. या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक आहे.

नाशिक : हिंगणघाट प्रकरणातील पीडित भगिनीची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली असून या भगिनींचे निधन मनाला चटका लावून जाणारे आहे. महाराष्ट्र हे माता भगिनींचा सन्मान करणारे राज्य असून समाजातील ही विकृत प्रवृत्ती खपवून घेतली जाणार नाही. या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक आहे. शासन या पीडित भगिनीला जलद न्याय मिळवून देईल तसेच त्यांच्या कुटुंबियांना मदत उपलब्ध करून दिली जाईल. मी पिडीत भगिनींच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. अशी प्रतिक्रीया अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.

संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको...

पीडितेच्या मृत्यूनंतर दारोडा पसिरात संतप्त ग्रामस्थांनी नागपूर-हैदराबाद महामार्ग बंद पाडला. यामुळे दोन किमीपर्यंत वाहनांची रांग लागली होती. संतप्त नागरिकांनी रोष व्यक्‍त करीत आरोपीला ताब्यात देण्याची मागणी लावून धरली. आरोपीला शिक्षा झाली तरच मुलीच्या आत्म्याला शांती मिळले, अशी प्रतिक्रिया पीडितेच्या वडिलांसह गावकऱ्यांनी व्यक्‍त केली. आग पीडितेच्या मृत्युमुळे राज्यभरात तणाव निर्माण झाला आहे.शाळा, महाविद्यालय व व्यापारी प्रतिष्ठानही बंद ठेवण्यात आली आहे. चौका-चौकात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. जवळपास तीनशे पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. संतप्त नागरिकांनी एकत्र येत नारोबाजी केली. अंकिताला न्याय मिळालाच पाहीजे, आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहीजे, "जाळून टाका जाळून टाका' अशा घोषणा संतप्त नागरिक देत होते.

हेही वाचा > PHOTOS :..अन् "चिमुकलीने" तोंडात रुपयाचे नाणे टाकले..ते गिळले सुध्दा!..धक्कादायक!

न्याय मिळाल्याशिवाय अंत्यसंस्कार नाही
सरकारकडून योग्य ती मदत व आरोपीला फाशी मिळणार नाही तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही, अशी प्रतिक्रिया पीडितेच्या वडिलांनी दिली होती. यांनतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फोन करून पीडितेच्या कुटुंबाचे सांत्वन केले आणि भावाला नोकशी देण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर कुटुंबीयांनी मृतदेह स्वीकारण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, संतप्त गावकऱ्यांनी न्याय मिळाल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका घेतल्याने तणावात आणखीनच भर पडली आहे

हेही वाचा > मुलाचे निधन एका बाजूलाच...सुन अन् सासू- सासऱ्यांचं भलतचं चाललयं!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chhagan Bhujbal Statement on Hinganghat woman burn case