esakal | रखडलेल्या कामांसाठी 185 कोटी - भुजबळ 
sakal

बोलून बातमी शोधा

Bhujbal 123.jpg

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत पुढील आर्थिक वर्षात जिल्ह्यासाठी राज्य सरकारच्या नियोजनानुसार आराखड्यासाठी 732.90 कोटींची मर्यादा आहे. मात्र, मागच्या सरकारच्या कार्यकाळात आकसाने काही प्रकल्प रखडले होते. अशा प्रकल्पांना पुन्हा गती देण्याची मागणी नियोजन समितीच्या आढावा बैठकीत लोकप्रतिनिधींनी केली. त्यानुसार गेल्या पाच वर्षांपासून धूळखात पडलेल्या बोटक्‍लबसह अनेक रखडलेल्या प्रकल्पांसाठी वाढीव 185 कोटींचा प्रस्ताव शासनाला सादर करण्याचा निर्णय झाला. त्यामुळे आता जिल्ह्यातील या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा मार्ग सुकर होणार आहे.

रखडलेल्या कामांसाठी 185 कोटी - भुजबळ 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक :  माजी मंत्री गिरीश महाजन पालकमंत्री असताना कलाग्राम, बोटक्‍लब, क्रीडासंकुल हे प्रकल्प मागे पडले होते. यातील काही प्रकल्प निधीअभावी बंद झाले होते. थंड बस्त्यात गेलेल्या प्रकल्पांना नियोजन मंडळाच्या सोमवारी (ता. 27) झालेल्या बैठकीत 2020-21 या आर्थिक वर्षाच्या प्रस्तावित नियोजनात 185 कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला. त्यासाठी वाढीव निधीची राज्य शासनाकडे मागणी केली जाणार आहे. 

जिल्ह्यातील या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा मार्ग सुकर

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत पुढील आर्थिक वर्षात जिल्ह्यासाठी राज्य सरकारच्या नियोजनानुसार आराखड्यासाठी 732.90 कोटींची मर्यादा आहे. मात्र, मागच्या सरकारच्या कार्यकाळात आकसाने काही प्रकल्प रखडले होते. अशा प्रकल्पांना पुन्हा गती देण्याची मागणी नियोजन समितीच्या आढावा बैठकीत लोकप्रतिनिधींनी केली. त्यानुसार गेल्या पाच वर्षांपासून धूळखात पडलेल्या बोटक्‍लबसह अनेक रखडलेल्या प्रकल्पांसाठी वाढीव 185 कोटींचा प्रस्ताव शासनाला सादर करण्याचा निर्णय झाला. त्यामुळे आता जिल्ह्यातील या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा मार्ग सुकर होणार आहे. 

अंगणवाड्यांना प्राधान्य 
जिल्ह्यातील अंगणवाड्यांच्या खोल्यांचा प्रश्‍न अतिशय बिकट आहे. अनेक गावांत मुले झाडाखाली अथवा मोकळ्या जागेत शिक्षण घेतात, अशी तक्रार लोकप्रतिनिधींनी केली. त्यावर हा विषय प्राधान्याने घेण्यात यावा. ज्या ज्या योजनांचा निधी अर्खचित राहील, तो त्यासाठी वळवावा. आठ वर्षांपूर्वी हा प्रश्‍न उपस्थित झाला होता. तेव्हा उघड्यावर भरणाऱ्या तीन हजार अंगणवाड्यांना 36 कोटींचा निधी दिला गेला. त्यातून दोन हजार अंगणवाड्यांच्या खोल्या, मुलांसाठी स्वच्छतागृहे, स्वयंपाकासाठी खोल्यांचे बांधकाम झाले. याच धर्तीवर यंदाही काही निधी शिल्लक राहत असल्यास त्यातून शाळा दुरुस्ती व अंगणवाड्यांची कामे हाती घेण्याचे निर्देश या वेळी पालकमंत्र्यांनी दिले. 

हेही वाचा > शंभर वर्षांचं गुहेतलं "त्यांचं" वास्तव्य..कठीण वनवास..अन् गुहेतून गृहप्रवेश!

असा आहे आर्थिक प्रस्ताव 
* सर्वसाधारण योजना : 78 कोटी 
* विशेष प्रकल्पांसाठी : 34 कोटी 
* आदिवासी उपयोजना : 73.24 कोटी 
* जिल्ह्याच्या दीडशे वर्षपूर्ती : एक कोटी 

हेही वाचा > आईच निघाली उलट्या काळजाची..शेवटी मुलाने संतापात..​

go to top