"स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भगवा फडकवा" मुख्यमंत्र्यांची नाशिकच्या लोकप्रतिनिधींना सूचना 

दीपक अहिरे
Friday, 22 January 2021

आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भगवा फडकविण्यासाठी पक्षसंघटनेची बांधणी करून काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना दिल्या.

निफाड (जि. नाशिक) : आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भगवा फडकविण्यासाठी पक्षसंघटनेची बांधणी करून काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना दिल्या.

अडीअडचणी व विकासकामांसंदर्भात साकडे

नाशिक जिल्ह्यातील विविध मतदारसंघातील लोकप्रतिनिधींशी मुख्यमंत्री ठाकरे यांनी गुरुवारी (ता. २१) सायंकाळी वर्षा निवासस्थानी बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली. या वेळी बैठकीस पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार अनिल देसाई, खासदार विनायक राऊत, युवासेनेचे वरुणजी सरदेसाई आदी उपस्थित होते. या वेळी नाशिक जिल्ह्यातील सर्वच नेत्यांनी आपापल्या मतदारसंघातील अडीअडचणी व विकासकामांसंदर्भात मुख्यमंत्री ठाकरे यांना साकडे घातले. याबाबत दखल घेत त्यांनी तातडीने समन्वय समिती स्थापन करून त्याबाबत कार्यवाहीचे निर्देश दिले. 

हेही वाचा > ''माझ्या बायकोला आधी वाचवा हो'', रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नवऱ्याचा आक्रोश; दुर्देवी घटना

निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही

निफाडचे माजी आमदार अनिल कदम, सिन्नरचे राजाभाऊ वाजे, देवळालीचे योगेश घोलप, इगतपुरीच्या निर्मला गावित, नाशिकचे सुनील बागूल, वसंत गिते, येवल्याचे संभाजी पवार, दिंडोरीचे भास्कर गावित, सुरगाण्याचे मोहन गांगुर्डे आदींनी आपापल्या मतदारसंघातील विविध विकासकामांच्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री ठाकरे यांना दिले. महायुतीचे सरकार असल्याने कोणत्याच मतदारसंघात विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही या वेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. 

हेही वाचा > तो शेवटचा विवाहसोहळा! काही समजण्याच्या आतच विवाहितेची जीवनयात्रा संपली; वाडीचौल्हेर गावात शोककळा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief Minister Thackeray met leaders from various constituencies in Nashik district marathi news