धक्कादायक! आईचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह...मुलाला शॉक...नैराश्यात केले असे

son 1.jpg
son 1.jpg

नाशिक : आईवर रुग्णालयात उपचार सुरू होते. मुलाने रुग्णालयात जाऊन आईची विचारपूस केली. त्यानंतर तो रात्री आठला घरी परतला. दरम्यान, त्याची बहीण आल्यावर आतून दार उघडत नसल्याने तिने दरवाजा तोडला. तेव्हा धक्कादायक दृश्य समोर होते

आईचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह म्हणून

आईचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नैराश्य आलेल्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नाशिक रोडला रोकडोबावाडीत घडली. या घटनेत २३ वर्षीय मुलाने आत्महत्या केली असून, त्याच्या आईचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मुलाने रुग्णालयात जाऊन आईची विचारपूस केली. त्यानंतर बुधवारी १५ जुलैला तो रात्री आठला घरी परतला. दरम्यान, त्याची बहीण आल्यावर आतून दार उघडत नसल्याने तिने दरवाजा तोडला. तेव्हा तिला भावाने गळफास घेतल्याचे दिसले. तत्काळ त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याबाबत उपनगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली.

निकालाच्या धाकाने मुलीची आत्महत्या 

 बारावी परीक्षेच्या निकालाच्या धाकाने मुलीने आत्महत्या केल्याची घटना राका कॉलनीत घडली. या मुलीने घरी असताना बारावी परीक्षेचा निकाल काय लागेल, या भितीने घरातल्या पंख्यास गळफास लावून आत्महत्या केली. याबाबत सरकारवाडा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com