
पश्चिम भागामध्ये लागवडी सुरु बऱ्यापैकी पूर्ण झाल्या असून मात्र इगतपुरीच्या पूर्व भागात लागवडी थांबल्या आहेत. ज्यांच्याकडे संरक्षित पाण्याचे साठे नाहीत. त्यांची अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे जुलैच्या मध्यापर्यंत अपेक्षित लागवड होऊ शकली नाही. त्र्यंबकेश्वर, सुरगाणा व पेठ या तालुक्यात ही अडचण आहे.
नाशिक : आदिवासी पश्चिम पट्ट्यात पावसाने ओढ दिल्याने भाताच्या रोपांची लागवड लांबली आहे. रोपे अधिक कालावधीची झाल्याने ती खराब होऊ लागल्याने शेतकऱ्यांनी विहिरीतील पाण्यापासून गाळ तयार करुन लागवड सुरु केली.
इगतपुरीच्या पूर्व भागात लागवडी थांबल्या
जिल्ह्यातील सर्वात जास्त पावसाचा व भात लागवडीचा तालुका इगतपुरी आहे. मात्र गेल्या ८ दिवसात १० ते १२ मिलीमीटरपर्यंत पाऊस होतोय. हा पाऊस लागवडी योग्य नसल्याने शेतकरी रोपांची पुन्हा लागवड करण्यासाठी धजावत नाहीत. पश्चिम भागामध्ये लागवडी सुरु बऱ्यापैकी पूर्ण झाल्या आहेत. मात्र इगतपुरीच्या पूर्व भागात लागवडी थांबल्या आहेत. ज्यांच्याकडे संरक्षित पाण्याचे साठे नाहीत. त्यांची अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे जुलैच्या मध्यापर्यंत अपेक्षित लागवड होऊ शकली नाही. त्र्यंबकेश्वर, सुरगाणा व पेठ या तालुक्यात ही अडचण आहे. उन्हाचा चटका वाढल्याने भात रोपे पिवळी पडली पडून खराब होण्याचे प्रमाण वाढते आहे. रोपे अधिक दिवसाची होऊन लागवड न झाल्याने उत्पादन घटण्याची भीती आहे.
७८ हजार ६१३ हेक्टर भाताचे क्षेत्र
(आकडे हेक्टरमध्ये)
तालुका क्षेत्र झालेली लागवड
इगतपुरी २६ हजार ६०३ ३६५८.९१
सुरगाणा १३ हजार ७१० २ हजार २७३
त्र्यंबकेश्वर ११ हजार ६३४ ८७०
पेठ ९ हजार ४६२ ८८४
कळवण ४ हजार ५२६ ०
सटाणा २ हजार ३१ ५.५०
नाशिक ३ हजार ७०८ २९.९०
हेही वाचा > आमदार फुटू नये म्हणून 'भाजप'कडून लॉलीपॉप...मिश्किल शैलीत भुजबळांची टीका
हवामानाच्या प्राप्त अंदाजानुसार पुढील पाच दिवसाचे पुढे काही जोरदार पावसाचे संकेत नाहीत. त्यामुळे पावसाची वाट पाहणे व नंतर आवश्यक पावसात गाळ झाल्यानंतर लागवडी करणे उचित ठरेल. - डॉ.दत्तात्रय कुसाळकर (सहयोगी संशोधन संचालक,विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी)
पाऊस झाल्यानंतर भाताची रोपे तयार केली. मात्र आता ही रोपे लागवडीयोग्य झाली आहेत. पण पाऊस नाही. रोपे खराब होत आहेत.त्यामुळे विहिरीतील पाण्यावर रोपांच्या लागवडीचा निर्णय घेतला. - शांताराम भोर (शेतकरी, साकूर, ता.इगतपुरी)
पावसाअभावी लागवडी थांबल्या आहेत. त्यामुळे यावर्षी दोन महिन्याची रोपे होऊन गेली, लागवडीच्या अडचणी वाढल्या आहेत. - यशवंत गावंडे (शेतकरी, गावंधपाडा, ता.पेठ)
हेही वाचा > वडील अंथरुणाला खिळलेले...मोलमजुरी करत विशालने बारावीत मिळवलं यश..वाचा फोटोमागच्या जिद्दीची कहाणी!