"नांदगाव हत्याकांडचा प्रसंगी तपास सीआयडीकडे"; आमदारांची ग्वाही

संजीव निकम
Monday, 10 August 2020

वाखारी येथील स्मशानभूमीत झालेल्या रक्षा विसर्जन विधीदरम्यान ग्रामस्थांनी आमदार कांदे यांच्याकडे घटनेच्या तपासाला वेग यावा व मारेकऱ्यांचा शोध लागून त्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी भावना व्यक्त केली.

नाशिक / नांदगाव : नांदगाव आणि मालेगाव येथील पोलिस यंत्रणा  सध्या योग्य दिशेने तपास करीत आहे.   तरीही त्यातून काहीच निष्पन्न न झाल्यास  मारेकऱ्यांचा लवकरात लवकर शोध लावण्यासाठी हे प्रकरण सीआयडीकडे सोपविण्याची मागणी आपण मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे व गृहमंत्री अनिल  देशमुख यांच्याकडे करणार आहोत, अशी ग्वाही नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी रविवारी दिली. 

प्रसंगी तपास सीआयडीकडे : आमदार कांदे 
वाखारी येथील स्मशानभूमीत झालेल्या रक्षा विसर्जन विधीदरम्यान ग्रामस्थांनी आमदार कांदे यांच्याकडे घटनेच्या तपासाला वेग यावा व मारेकऱ्यांचा शोध लागून त्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी भावना व्यक्त केली. आमदार कांदे यांनी मृत समाधानचे वडील अण्णा चव्हाण, आई चंद्रकलाबाई,  भाऊ दादाजी  व कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यावेळी त्यांनी ही ग्वाही दिली. शिवसेना नेते  संजय चव्हाण यांच्यासह  ग्रामस्थ  व गावातील विविध पदाधिकारी  उपस्थित होते.   

हेही वाचा - थरारक! नांदगाव हत्याकांडाने जाग्या केल्या सुपडू पाटील हत्याकांडच्या स्मृती..आजही ग्रामस्थांमध्ये संतप्त भावना

दरम्यान, खासदार डॉ. भारती पवार यांनीही वाखारीचे ग्रामस्थ, चव्हाण कुटुंबीय आणि त्यांच्या आप्तेष्टांची भेट घेत या  घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. मनमाडचे पोलिस उपाधीक्षक श्री. साळवे, नांदगावचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे , मालेगाव तालुका पोलिस निरीक्षक श्री. भदाणे  यांच्याशी चर्चा करत घटनेच्या तपासाबाबत माहिती घेतली. निमगाव जिल्हा परिषद गटाचे सदस्य जे.  डी.  हिरे या वेळी उपस्थित होते.  

हेही वाचा > नांदगाव हादरले...एकाच कुटुंबातील सर्वांची निघृण हत्या; मोठी खळबळ

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CID will investigate Nandgaon murder case said by mla kande nashik marathi news