esakal | नात्याला काळिमा फासणारी घटना! अल्पवयीन मुलीवर बापाकडून अत्याचार; मुलाला जन्म दिल्याने प्रकार उघडकीस
sakal

बोलून बातमी शोधा

sad-woman-with-tears 1.jpg

तिने मुलाला जन्म दिला असून, तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पीडित मुलीवर अत्याचारानंतर तिला बाहेर वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी देण्यात येत होती.

नात्याला काळिमा फासणारी घटना! अल्पवयीन मुलीवर बापाकडून अत्याचार; मुलाला जन्म दिल्याने प्रकार उघडकीस

sakal_logo
By
प्रमोद दंडगव्हाळ

सिडको (नाशिक) : नात्याला काळिमा फासणारी सिडको परिसरात घडली. स्वत:च्याच बापाने तर मुलीवर अत्याचार केलेच सोबत त्याच्या दोन साथिदारांनीही मुलीवर अत्याचार केले. या प्रकारातून मुलगीने मुलाला जन्म दिल्याने ही बाब उघडकीस आली. वाचा नेमका काय आहे प्रकार?

अशी आहे घटना

बापासह दोघांनी अवघ्या १४ वर्षे वयाच्या मुलीवर वारंवार अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार सिडको भागात उघडकीस आला आहे. पीडित अल्पवयीन मुलीने मुलाला जन्म दिला असून, या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. लेखानगर परिसरातील झोपडपट्टीत राहणाऱ्या या नराधम बापासह दोघांनी केलेल्या अत्याचारामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिली. तिने मुलाला जन्म दिला असून, तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पीडित मुलीवर अत्याचारानंतर तिला बाहेर वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी देण्यात येत होती. रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व सामाजिक कार्यकर्त्यांनी तिला धीर दिला असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. 

हेही वाचा > लिफ्ट देण्याच्या बहाण्याने करायचे लूटमार; मुंबईतील संशयिताच्या नाशिक पोलिसांनी आवळल्या मुसक्या

अंबड पोलिसांनी पीडितेच्या फिर्यादीनुसार तिच्या वडिलांसह संशयित अरबाज शेख व गिरणीवाला उत्तम (रा. लेखानगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे परिसरात संताप व्यक्त होत असून, नराधमांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.  

हेही वाचा > ३० क्विंटल कांदा घेऊन तोतया व्यापारी फरारी; कधी थांबणार शेतकऱ्याची फसवणूक?