esakal | नागरिकांनो, दिवाळीत बाहेर जाताय? काळजी घ्या; नाहीतर आपली फसगत नक्की
sakal

बोलून बातमी शोधा

crowed.jpg

प्रवासात कोणीही दिलेले खाद्य पदार्थ किंवा पेय खाऊ, पिऊ नयेत. त्यात गुंगीचे औषधही असू शकते. प्रवासात अनोळखी महिला, पुरुषांपासून सावध राहावे. गर्दीच्या ठिकाणी व बसमध्ये चढताना, उतरताना खिशातील पाकीट, पर्स, बॅगकडे लक्ष ठेवावे.

नागरिकांनो, दिवाळीत बाहेर जाताय? काळजी घ्या; नाहीतर आपली फसगत नक्की

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नाशिक रोड : दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर चोरटेही घराबाहेर पडले असून, सोनसाखळी चोरीसह घरफोट्या वाढल्या आहेत. त्यामुळे शहर पोलिसांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

गर्दीच्या ठिकाणी व बसमध्ये अशी काळजी घ्या

दिवाळीच्या खरेदीला बाजारात जाताना घरात पैसे व्यवस्थित ठेवून जा. दिवाळी, विवाहाला बाहेरगावी जाताना मौल्यवान वस्तू, पैसे बँकेत किंवा सोबत घेऊन जावे. बाहेरगावी जाणार असल्यास शेजाऱ्यांना, तसेच पोलिसांना बाहेरगावी जात असल्याची माहिती द्यावी. चेन स्नॅचिंग होऊ नये म्हणून बाहेरगावी जाताना महिलांनी प्रवासात दागिने घालून जाऊ नये, बाहेर रस्त्याने पायी जात असताना महिलांनी त्यांचे मंगळसूत्र झाकून चालावे. प्रवासात कोणीही दिलेले खाद्य पदार्थ किंवा पेय खाऊ, पिऊ नयेत. त्यात गुंगीचे औषधही असू शकते. प्रवासात अनोळखी महिला, पुरुषांपासून सावध राहावे. गर्दीच्या ठिकाणी व बसमध्ये चढताना, उतरताना खिशातील पाकीट, पर्स, बॅगकडे लक्ष ठेवावे.

हेही वाचा > विवाहितेच्या अंगावरील स्त्रीधन काढून अपहार प्रकरणी गुन्हा दाखल 

ऑनलाइन मोह टाळा

व्यापारी, दुकानदार, सराफ यांनीही या काळात मोठ्या प्रमाणात माल खरेदी केलेला असतो. त्यामुळे रात्रीचे वेळी सुरक्षा ठेवावी, सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. बाजारात खरेदी करताना मोबाईल किंवा पैसे वरच्या खिशात ठेऊ नये, गाडी व्यवस्थित ठिकाणी पार्क करून हॅन्डल लॉक करून ठेवावे. कोणत्याही प्रकारे ऑनलाइनच्या आमिषाला बळी पडू नये. फोनवर बँक खात्याचा एटीएमचा पासवर्ड, तसेच फोनपे, गुगलपे, पेटीएम इत्यादी प्रकारच्या ऑनलाइन ट्रान्जेक्शनबाबतचा ओटीपी कोणालाही शेअर करू नका. एमआयडीसी परिसरातील कंपनीमालक, तसेच वर्कशॉपमालक यांनी कंपनी बंद ठेवताना सुट्यांचे दिवसांतील सुरक्षिततेचा विचार करून सुरक्षारक्षक नेमावेत, तसेच सीसीटीव्ही कॅमेरे व इतर आवश्यक उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा > अरेच्चा! लासलगावचा कांदा ‘कौन बनेगा करोडपती’वर; लासलगावचे नाव पुन्हा प्रकाशझोतात