क्रूर नियती! "बाबा..तुमच्या दशक्रियेला नाही येऊ शकले..म्हणून तुमच्याकडेच आले" वडिलांमागे लेकीचीही अंत्ययात्रा

प्रमोद दंडगव्हाळ
Monday, 10 August 2020

वडिल जाण्याचे दु:ख अजूनही ओलेच होते. दशक्रिया विधीला लेकीचे जायचेच राहून गेले. कारण काळच असा आला की लेकही निघाली वडिलांमागे स्वर्गाच्या वाटेला...वाचा ह्रदयद्रावक आपबिती

नाशिक / सिडको : वडिल जाण्याचे दु:ख अजूनही ओलेच होते. दशक्रिया विधीला लेकीचे जायचेच राहून गेले. कारण काळच असा आला की लेकही निघाली वडिलांमागे स्वर्गाच्या वाटेला...वाचा ह्रदयद्रावक आपबिती

बाबांच्या दशक्रियेला नाही येऊ शकले

नाशिक येथील उत्तमनगरला राहणाऱ्या रत्नाबाई प्रवीण महाजन (वय ३७) पती प्रवीण महाजन यांच्यासमवेत चोपड्याजवळील अडावद येथे वडील पांडुरंग महाजन यांच्या दशक्रियेसाठी दुचाकीवरून जात होत्या. गावापासून आठ ते दहा किलोमीटर अंतरावर चोपडा रोडवर गतिरोधकावर त्यांची दुचाकी जोरात उडाली व त्या रस्त्यावर पडल्या. याच क्षणी मागून येणाऱ्या ट्रकचे चाक त्यांच्या अंगावरून गेले. त्यात रत्नाबाई महाजन यांचा जागीच मृत्यू झाला. प्रवीण महाजन बाजूला पडल्याने ते वाचले.

हेही वाचा - थरारक! नांदगाव हत्याकांडाने जाग्या केल्या सुपडू पाटील हत्याकांडच्या स्मृती..आजही ग्रामस्थांमध्ये संतप्त भावना

महाजन कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर

वडील वारल्याचे दुःख सोबत घेऊन त्यांच्या दशक्रियेसाठी जात असताना पुन्हा एकदा कुटुंबीयांना मुलीच्या मृत्यूची बातमी आल्याने महाजन कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. रत्नाबाई महाजन यांच्या मागे पती, मुलगा व मुलगी असा परिवार असून, मुलगी नुकतीच दहावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली, तर मुलगा नववीत शिकत आहे. या घटनेने सिडको भागात हळहळ व्यक्त होत आहे. वडिलांच्या दशक्रिया विधीसाठी जाणाऱ्या सिडकोतील महिलेचा रविवारी (ता. १०) ट्रकच्या चाकाखाली सापडून मृत्यू झाला.

हेही वाचा > नांदगाव हादरले...एकाच कुटुंबातील सर्वांची निघृण हत्या; मोठी खळबळ

संपादन - ज्योती देवरे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: woman died in road accident at nashik marathi news