"दुकान बंदबाबत व्यापाऱ्यांमध्ये गोंधळ; अस्पष्टता दूर करण्याची व्यावसायिकांची मागणी

अंबादास शिंदे
Monday, 14 September 2020

सध्या सातची वेळ आहे, की ती लॉकडाउन काळापुरती आहे की, नेहमीच्या वेळेप्रमाणे दुकाने बंद करण्याची वेळ आहे, याबाबत व्यापाऱ्यांमध्ये गोंधळ आहे. सध्या कुणी सातला दुकान बंद करतो, तर कुणी रात्री नऊला. जी संदिग्धता दुकाने बंद करण्याच्या वेळेबाबत आहे, तशीच ती सम-विषम तारखांबाबतही आहे.

नाशिक रोड : सध्या सातची वेळ आहे, की ती लॉकडाउन काळापुरती आहे की, नेहमीच्या वेळेप्रमाणे दुकाने बंद करण्याची वेळ आहे, याबाबत व्यापाऱ्यांमध्ये गोंधळ आहे. सध्या कुणी सातला दुकान बंद करतो, तर कुणी रात्री नऊला. जी संदिग्धता दुकाने बंद करण्याच्या वेळेबाबत आहे, तशीच ती सम-विषम तारखांबाबतही आहे. त्यामुळे दुकान बंदबाबत अस्पष्टता दूर व्हावी अशी मागणी व्यावसायिकांनी केली आहे.

दुकान बंदबाबत अस्पष्टता दूर व्हावी 

कोरोनावर नियंत्रणासाठी महापालिकेचे तत्कालीन आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी प्रथम सायंकाळी पाच व त्यानंतर सातला दुकाने बंद करण्याची वेळ केली होती. परंतु सध्या या वेळांबाबत कुठलाही नियम पाळला जात नाही. सध्या सातची वेळ आहे, की ती लॉकडाउन काळापुरती आहे की, नेहमीच्या वेळेप्रमाणे दुकाने बंद करण्याची वेळ आहे, याबाबत व्यापाऱ्यांमध्ये गोंधळ आहे. सध्या कुणी सातला दुकान बंद करतो, तर कुणी रात्री नऊला. जी संदिग्धता दुकाने बंद करण्याच्या वेळेबाबत आहे, तशीच ती सम-विषम तारखांबाबतही आहे. सम-विषमबाबत नियम पाळले जात नाहीत. प्रामाणिक व्यापाऱ्यांवर अन्याय होत आहे. सायंकाळी दुकाने बंद करण्याच्या वेळेबाबतचा गोंधळ दूर करण्याची मागणी जेल रोड-नाशिक रोड किराणा व्यापारी संघटनेने केली आहे. नाशिक रोडला दुकान बंद करण्याबाबत कुठल्याही नियमावलीचे पालन होत नाही. त्यामुळे व्यावसायिकांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले.

हेही वाचा > ह्रदयद्रावक! मोबाईल मिळेना म्हणून भितीपोटी विद्यार्थीनीची आत्महत्या; ऑनलाइन शिक्षणाचा आणखी एक बळी

नाशिक रोड व्यावसायिकांची मागणी 

दुकाने सुरू करण्याची व बंद करण्याची वेळ तसेच नियमांची अधिकृत घोषणा करावी तसेच त्याची अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष सुनील महाले, उपाध्यक्ष प्रकाश कांकरिया, संजय आडके, संतोष डेर्ले, अरुण लोखंडे, दिलीप बोराडे, अशोक कवडे, संतोष अवस्थी, मणिलाल पटेल, प्रदीप केला आदींनी केली आहे. 

हेही वाचा > संतापजनक! कोरोनाबाधित महिलेचा सफाई कर्मचाऱ्याकडून विनयभंग; घटनेनंतर रुग्णालयात खळबळ

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: clarification about shop closure Demand from professionals nashik marathi news