सीईटी परीक्षांबाबत धोरण स्‍पष्ट करा, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची मागणी 

Clarify the policy regarding CET exams, demand of Nationalist Students Congress
Clarify the policy regarding CET exams, demand of Nationalist Students Congress
Updated on

नाशिक : बारावी तसेच पदवीनंतर विविध व्‍यावसायिक अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेतली जात असते. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्‍या प्रवेशाकरीता राज्‍यभरातील सुमारे सात लाख विद्यार्थी प्रतिक्षेत आहेत. मात्र सध्याच्‍या परीस्‍थितीत संपूर्ण प्रक्रिया ठप्प झालेली आहे. या पार्श्वभुमिवर सीईटी परीक्षांबाबत शासनाने धोरण स्‍पष्ट करावे, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे केली आहे. यासंदर्भात संघटनेच्‍या उत्तर महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष ॲड. चिन्‍मय गाढे यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना निवेदन पाठविले आहे. 

विविध अभ्यासक्रमांच्‍या तेरा प्रवेश परीक्षांच्‍या वेळापत्रकाचे नियोजन सीईटी सेलमार्फत केले होते. यात विधी, शिक्षणशास्‍त्र, अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्‍त्र अशा विविध अभ्यासक्रमांचा समावेश आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, या परीक्षांच्‍या वेळापत्रकास स्‍थगिती देतांना परीक्षा पुढे ढकलल्‍या होत्‍या. परंतु परीक्षत्त केव्‍हा, कुठे, कुठल्‍या स्‍वरूपात होतील, याबद्दल विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम आहे. तरी सीईटी परीक्षांबाबत योग्‍य धोरण जाहीर करून विद्यार्थी व पालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे.  

संपादन - रोहित कणसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com