#COVID19 : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाजार समितीत स्वच्छता मोहीम

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 मार्च 2020

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत नाशिक शहरासह जिल्ह्या भरातून शेतकरी वर्ग पालेभाज्या व फळभाज्या शेतमाल घेऊन येत असतात. सध्या जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे.रविवार (ता.२२) रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यु जाहीर केला,यामुळे बाजार समिती बंद ठेवण्यात आली.बाजार समितीत येणाऱ्या शेतकरी व्यापारी आडते व हमाल वर्गास कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी उपाययोजना म्हणून मुख्य बाजार समितीच्या आवारात स्वच्छता मोहीम राबवित धुवून घेण्यात आले.

नाशिक / म्हसरूळ : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या शेतकरी,व्यापारी आडते व हमाल यांच्या आरोग्यास कोरोना विषाणूचा प्रादुर्भावामुळे कुठल्याही प्रकारची बाधा होऊ नये यासाठी उपाययोजना म्हणून बाजार समिती आवारात स्वच्छता मोहीम संचालक मंडळ व कर्मचारी यांनी राबविली.

बाजार समितीच्या आवारात स्वच्छता मोहीम

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत नाशिक शहरासह जिल्ह्या भरातून शेतकरी वर्ग पालेभाज्या व फळभाज्या शेतमाल घेऊन येत असतात. सध्या जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे.रविवार (ता.२२) रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यु जाहीर केला,यामुळे बाजार समिती बंद ठेवण्यात आली.बाजार समितीत येणाऱ्या शेतकरी व्यापारी आडते व हमाल वर्गास कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी उपाययोजना म्हणून मुख्य बाजार समितीच्या आवारात स्वच्छता मोहीम राबवित धुवून घेण्यात आले.

यावेळी बाजार समिती सभापती संपत सकाळे,संचालक तुकाराम पेखळे,रवींद्र भोये,विश्वास नागरे,संदीप पाटील सचिव अरुण काळे,अभियंता रहाडे,स्वच्छ ता निरीक्षक आर बी तुपे ,सुरक्षा अधिकारी व कर्मचारी यांनी पाहणी करून बाजार समिती आवारातील असलेले कचरा गोळा केला.पाण्याचे ट्रंकर च्या सहायाने स्वच्छ धुवून घेण्यात आले आणि त्यानंतर क्लोरोबाॅन्ड या औषधाची फवारणी देखील करण्यात आली.यात जवळपास १०० हून अधिक टँकर पाणी ,२० टॅक्टर् औषध फवारणी करण्यात आली. ही स्वच्छता मोहीम बाजार समिती मुख्य आवार,शरदचंद्र मार्केट यार्ड,नाशिक रोड उप बाजार येथे राबविली.

हेही वाचा > COVID-19 : photos : 'त्याच्या' हातावरचा 'क्वारंटाइन' बघून प्रवाशांना भरली धडकी!...झटक्यात बस झाली रिकामी

हेही वाचा > COVID-19 : दुबईहून आलेल्या 'त्या' दोन क्वारंटाइन यांना इगतपुरी रेल्वे स्टेशनवर उतरवले!

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cleanliness campaign to prevent the spread of corona virus in market committee Nashik marathi news