चार विषय समिती सदस्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा; महासभेत सदस्यांची घोषणा

विक्रांत मते
Wednesday, 14 October 2020

प्रत्येक समितीवर भाजपचेच वर्चस्व असून, भाजपचे पाच, शिवसेनेचे दोन, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी एक सदस्य आहे. समितीचा कार्यकाळ अवघ्या पाच महिन्यांचा राहणार असल्याने सदस्यत्वासाठी फारसे कोणी इच्छुक नसल्याची बाब समोर आली आहे. 

नाशिक : प्रभाग समिती सभापतिपदांच्या निवडणुकांना हिरवा कंदील मिळाल्यानंतर आता चार विषय समित्यांच्या सदस्यपदाच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. २० ऑक्टोबरला होणाऱ्या महासभेत सदस्यांची घोषणा महापौर सतीश कुलकर्णी करतील. त्यानंतर विभागीय आयुक्तांकडे सदस्य नियुक्तीचा प्रस्ताव सादर झाल्यानंतर सभापती व उपसभापतिपदांसाठी निवडणूक होईल. 

कार्यकाळ अवघ्या पाच महिन्यांचा

महापालिकेत महिला व बालकल्याण समिती, विधी समिती, वैद्यकीय व आरोग्य समिती, तसेच शहर सुधार समिती गठीत करण्यात आली. प्रत्येक समितीवर नऊ सदस्यांची नियुक्ती करून त्यांच्यातून सभापती व उपसभापती यांची नियुक्ती केली जाते. कोरोनामुळे या समित्यांची मुदत संपुष्टात आल्यानंतर नवीन सदस्यांची घोषणा झाली नाही. प्रभाग समिती सभापतिपदाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर विषय समिती सदस्यांसाठी महासभेत नियुक्तीप्रक्रिया राबविली जाणार आहे. चारही समित्यांवर प्रत्येकी नऊ सदस्य आहेत. प्रत्येक समितीवर भाजपचेच वर्चस्व असून, भाजपचे पाच, शिवसेनेचे दोन, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी एक सदस्य आहे. समितीचा कार्यकाळ अवघ्या पाच महिन्यांचा राहणार असल्याने सदस्यत्वासाठी फारसे कोणी इच्छुक नसल्याची बाब समोर आली आहे. 

हेही वाचा > एकुलती एक चिमुरडी झाली पोरकी! बाप अपराधी तर आई देवाघरी; सातपूरमधील दुर्दैवी घटना

हेही वाचा > धक्कादायक! आजोबांचे हातपाय बांधून नातूने फेकले नाल्यात; अंगावर काटा आणणारी करतूत 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A clear way to appoint four subject committee members nashik marathi news