esakal | मुंबई-पुणे-नाशिक विकासाच्या सुवर्णत्रिकोणाला प्राधान्य : उद्धव ठाकरे 
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav-Thackeray.jpg

आदिवासी भागातील पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलांना वाळूपुरवठा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. मनमाड पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. 

मुंबई-पुणे-नाशिक विकासाच्या सुवर्णत्रिकोणाला प्राधान्य : उद्धव ठाकरे 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मुंबई-पुणे-नाशिक हा विकासाचा सुवर्णत्रिकोण पूर्ण करण्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (ता. 30) येथे दिली. तसेच शेती उद्योगाला चालना देणाऱ्या निफाड ड्रायपोर्टसाठी आवश्‍यक ते निर्णय घेण्याचा शब्दही त्यांनी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयातील नाशिक जिल्ह्याच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. 

सर्वांगीण विकासावर लक्ष 
मालेगाव तालुक्‍यातील समस्या सोडविण्यासाठी तसेच मालेगावच्या सर्वांगीण विकासावर लक्ष दिले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिकमधील उपकेंद्राचा आठवड्यात निर्णय घेतला जाईल. नदीजोड प्रकल्प, पाणी आरक्षण प्रश्‍नांबाबत स्वतंत्र बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. आदिवासी भागातील पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलांना वाळूपुरवठा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. मनमाड पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न 
केले जातील, अशी माहिती दिली. 

पर्यटनस्थळांना भेटी देणार 
नांदूरमध्यमेश्‍वर पक्षी अभयारण्याला रामसर हा आंतरराष्ट्रीय पर्यटन पाणथळाचा दर्जा मिळाला आहे. इतर पर्यटन केंद्रांचा विकास करण्यासाठी प्रत्यक्ष भेटी देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच जनतेच्या समस्या व प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी विभागीय बैठका घेण्यात येत आहेत. त्या माध्यमातून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.  

हेही वाचा >  PHOTO : ह्रदयद्रावक! "आई मला भुक लागलीय" अडीज महिन्याचा तान्हुला शोधतोय आईला.. कारण...

निफाड ड्रायपोर्टसाठी आवश्‍यक ते निर्णय घेणार 

पालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादा भुसे यांच्यासह आमदार नरहरी झिरवाळ, दिलीप बनकर, डॉ. राहुल आहेर, हेमंत टकले, प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, ऍड. माणिकराव कोकाटे, सरोज अहिरे, मौलाना मुफ्ती इस्माईल, ऍड. राहुल ढिकले, नरेंद्र दराडे, किशोर दराडे, दिलीप बोरसे, नितीन पवार, सुहास कांदे, हिरामण खोसकर, मुख्य सचिव अजोय मेहता, कृषी सचिव एकनाथ डवले, जलसंपदा सचिव आय. एस. चहल, ऊर्जा सचिव असिमकुमार गुप्ता, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी उज्ज्वला बावके आदी उपस्थित होते. 

हेही वाचा > 'ज्यांना' संकटग्रस्त अबला 'तो' समजत होता...त्या तर चक्क...विश्वास नांगरे पाटलांचा फंडा यशस्वी! 

go to top