दृष्टिबाधितांचा आंतरराष्ट्रीय जागतिक विक्रम; जिल्हाधिकाऱ्यांनीही केले तोंडभरुन कौतुक

world recoreder.jpg
world recoreder.jpg

नाशिक : दृष्टिबाधित सायकलवीर अजय लालवाणी याने मुंबई-गोंदिया-मुंबई अशी दोन हजार दहा किलोमीटरची सोलो सायकल चालवत ब्राव्हो अंतरराष्ट्रीय जागतिक विक्रम केला. यावर अनेकांना यातून जीवनात रडत बसू नका, तर आपत्तीवर मात करत आत्मविश्वासाने कार्य करावे, अशी निश्चित प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले. 

चार जागतिक विक्रमवीरांचा सन्मान

जिल्हाधिकारी मांढरे यांनी चार जागतिक विक्रमवीरांचा सन्मान केला. या वेळी संकेत भानोसे, रोहित कानडे आदी उपस्थित होते. गरुडझेप प्रतिष्ठान सामाजिक संस्था अनेक उपक्रम राबवत आपली ओळख निर्माण करत आहे. आजपर्यंत संस्थेकडे १४ जागतिक विक्रम प्रमाणपत्र जमा झाले आहेत. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संदीप भानोसे यांनी वाहतूक सुरक्षा अभियान राबवून सहा जागतिक विक्रम केले. दृष्टिबाधित सागर बोडके यांच्या नावावर दोन विक्रम आहेत. दिव्यांग अंजना प्रधान हिने ११ वेळा कळसूबाई शिखर सर करून विक्रम रचला आहे. 

यांच्या नावावर चार जागतिक विक्रम

अंध नेहा पावसकर यांच्या नावावर चार जागतिक विक्रम आहेत. अजय लालवाणी याने ऑक्टोबर २०१८ ला तश्कांत येथे दिव्यांग ज्यूदो वर्ल्ड कपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. डिसेंबर २०१९ ला सात दिवसात मुंबई-गोवा-मुंबई ही एक हजार २०० किलोमीटरची सोलो सायकल राइड पूर्ण केली आहे. दरम्यान, ऑक्टोबरमध्ये सागर बोडके, अजय लालवाणी व संकेत भानोसे काश्मीर ते कन्याकुमारी सायकल मोहीम करणार आहे. दानशूर व्यक्ती व संस्थांनी सढळ हाताने मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन भानोसे यांनी केले आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com