BREAKING : मालेगावची परिस्थिती हाताळण्यासाठी विशेष IAS अधिकाऱ्यांची नेमणूक..'हे' अधिकारी सांभाळणार जबाबदारी

ias pankaj aashiya.jpg
ias pankaj aashiya.jpg

नाशिक : गेल्या आठवड्याभरात कोरोनाच्या फैलावामुळे चर्चेत आलेल्या मालेगावची परीस्थिती आटोक्‍यात आणण्यासाठी प्रशासकीय पातळीवरील प्रयत्न गतिमान झालेले आहेत. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी रविवारी (ता.12) मालेगावची परीस्थिती हाताळण्यासाठी आयएएस अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी नियुक्‍ती केली आहे. दरम्यान गेल्या चोवीस तासांत मालेगावला 18 कोरोना बाधित आढळून आले असून, आतापर्यंत चांदवडच्या एकासह एकूण कोरोना पॉझिटीव्हची संख्या 29 वर पोहचली आहे. तर एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाच्या वाढत्या रूग्णांच्या पार्श्‍वभूमिवर जिल्हाधिकारींचा निर्णय

कोरोनाचा पहिला रूग्ण आढळून आल्यानंतर तातडीने जिल्हाधिकारी सूरज मांढरे व अधिकाऱ्यांनी मालेगाव गाठत नियोजन आणखीला सुरवात केली होती. यानंतर इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरलाही सुरवात करण्यात आली होती. मात्र रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने जिल्हाधिकारी मांढरे यांनी अधिक गतीशिल पावले उचललेली आहेत.

कोरोना संसर्गाचा प्रसार तातडीने नियंत्रणात आणण्याची आवश्‍यकता
रविवारी (ता.12) डॉ. पंकज आशिया यांना मालेगावमधील कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी समन्वयक म्हणून जबाबदारी मांढरे यांनी सोपविली आहे. त्यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे, की मालेगावची भौगोलिक रचना आणि तेथील वस्त्यांची रचना विचारात घेता, तेथील कोरोना संसर्गाचा प्रसार तातडीने नियंत्रणात आणण्याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे. त्यामुळे मालेगावसाठी स्थानिक इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर निर्माण केले आहे. व विविध विभागातील अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या निश्‍चित केलेल्या आहेत. या सर्व अधिकाऱ्यांवर स्थानिक पातळीवर प्रभावी पर्यवेक्षण करणे तसेच त्यांच्यात आपसात पूर्ण समन्वय राखून एकत्रित कार्यवाहीचा परीणाम साधला जाणे आवश्‍यक आहे. त्यामुळे प्रशासकीय सेवेतील प्रकल्प अधिकारी तथा कळवणचे सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना घटना व्यवस्थापक व प्रमुख समन्वयक म्हणून नियुक्‍त करीत असल्याचे मांढरे यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com