raddhakrushna game 2.jpg
raddhakrushna game 2.jpg

कोरोनाबाबत खोडसाळपणा करणाऱ्यांवर होणार कारवाई; आयुक्तांचा इशारा

Published on

नाशिक : महापालिकेच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात असताना या रुग्णालयात यापूर्वी दाखल असलेल्या काही व्यक्तींकडून सोशल मीडियाद्वारे रुग्णालयासंदर्भात गैरसमज पसरविले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याची आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी गंभीरपणे दखल घेत गैरसमज पसरविण्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे. शासनाच्या निकषाप्रमाणेच रुग्णांवर उपचार केला जात असल्याचा दावा त्यांनी केला. 

रुग्णांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले तरी विलगीकरण कक्षात

कोरोनावर उपचार करण्यासाठी महापालिकेने कथडा येथील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयाचे रूपांतर "कोविड-19' मध्ये केले आहे. राज्य शासनानेही त्यास मान्यता दिली आहे. शहरी भागात कोरोना पॉझिटिव्ह किंवा संशयित म्हणून आढळले तरी याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जाते. शहरात खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना बाधितांवर उपचार होत नाहीत. त्यामुळे कोरोनाबाधित सर्वांनाच महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले जाते. शासनाच्या सूचनेनुसारच रुग्णालयात उपचार केले जातात. रुग्णांच्या स्वॅबचे नमुने रोज पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जातात. पुणे येथून 48 तासांत तपासणीचा अहवाल ई-मेलद्वारे प्राप्त होतो. तपासणी साठी नमुन्यांची संख्या वाढत असल्याने काही रुग्णांचे अहवाल प्राप्त होण्यास विलंब होतो, तोपर्यंत कोरोनाबाधित म्हणूनच उपचार करणे बंधनकारक असल्याने त्या अनुषंगाने उपचार होत असल्याचे स्पष्टीकरण देताना रुग्णांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले तरी त्यांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवले जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

शासन निकषांचे पालन 

डॉ. हुसेन रुग्णालयात रुग्णांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष, लक्षणे असणाऱ्यांसाठी वेगळा कक्ष स्थापन करण्यात आला आहे. लक्षणे नसलेल्या व्यक्तींसाठीही स्वतंत्र कक्ष आहे. दोन रुग्णांमध्ये अंतर, प्रत्येक वॉर्डासाठी स्वतंत्र स्वच्छतागृह व नाहणीघरची व्यवस्था करण्यात आली आहे. हात धुण्यासाठी तसेच साबण व सॅनिटायझरची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. दोन रुग्ण किंवा व्यक्तींमध्ये संपर्क येणार नाही याची खबरदारी घेतली जात असल्याने काही रुग्णांकडून पसरविलेली माहिती अज्ञानातून दिली असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com