
आर्थिकदृष्ट्या गांजलेले ग्राहक अशा खोट्या आमिषांना बळी पडून कर्ज देणाऱ्या संस्था शोधत असतात, असे ग्राहक अलगद जाळ्यात अडकतात व त्यांची फसवणूक होते. कर्जदारांकडून अधिक व्याज व छुपे इतर आकार वसूल केले जातात. कर्जदाराकडून कर्जाची वसुली करण्यासाठी दडपशाही व अस्वीकार्य तत्त्व या अनधिकृत संस्थांकडून अनुसरण्यात येते.
नाशिक : खोटी आमिषे दाखवून ग्राहकांची फसवणूक करणारे, तसेच वित्तीय कर्ज देणारे अनधिकृत डिजिटल मंच आणि मोबाईल अॅप्लिकेशनच्या तक्रारीसाठी रिझर्व्ह बँकेने ‘सचेत’ पोर्टलचा पर्याय सुचविला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक योगेश दायाल यांनी निवेदनाद्वारे ही माहिती जाहीर केली आहे.
असे ग्राहक अलगद जाळ्यात अडकतात
ग्राहकांना व उद्योजकांना जलद गतीने व विनाअडचणी कर्ज उपलब्ध करून देण्याची ग्वाही देऊन अनधिकृत डिजिटल मंच व मोबाईल अॅप्लिकेशनचा सध्या भडिमार सुरू आहे. आर्थिकदृष्ट्या गांजलेले ग्राहक अशा खोट्या आमिषांना बळी पडून कर्ज देणाऱ्या संस्था शोधत असतात, असे ग्राहक अलगद जाळ्यात अडकतात व त्यांची फसवणूक होते. कर्जदारांकडून अधिक व्याज व छुपे इतर आकार वसूल केले जातात. कर्जदाराकडून कर्जाची वसुली करण्यासाठी दडपशाही व अस्वीकार्य तत्त्व या अनधिकृत संस्थांकडून अनुसरण्यात येते.
डेटाची होते चोरी
कर्जदाराच्या मोबाईलवरील डेटा मिळविण्यासाठी अनधिकृत बँकांकडून कराराचा गैरवापर होत असल्याचे रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनास आले आहे. अनधिकृत डिजिटल मंच, मोबाईल ॲप्स व बँकांच्या बेकायदेशीर कार्यकृतीला बळी न पडण्यासाठी ऑनलाइन किंवा मोबाईल अॅप्लिकेशन कर्ज देऊ करणाऱ्या कंपन्या, संस्था यांचा खरेपणा व पूर्वइतिहास ग्राहकांनी तपासून पाहावा. ग्राहकांनी केवायसी कागदपत्रांच्या प्रती अज्ञात व्यक्ती, ऑनलाइन किंवा मोबाईल ओटीपी शेअर करू नये, ही खबरदारी घेण्याचे आवाहन श्री. दायाल यांनी केले आहे.
बिगर बँकिंग संस्थांवर बंधने
रिझर्व्ह बँकेने दिलेल्या निर्देशानुसार बँका व बिगर बँकिंग वित्तीय संस्था (एनबीएफसी) यांच्या वतीने वापरण्यात येणारे डिजिटल कर्जदायी संस्थांनी त्यांच्या ग्राहकांना बँकांची व अबँकीय वित्तीय संस्थांची नावे सुरवातीलाच जाहीर करावीत. रिझर्व्ह बँकेकडे नोंदणीकृत केलेल्या वित्तीय संस्था (एनबीएफसी) ची नावे व पत्ते जाहीर करण्याचे बंधन घातले आहे.
हेही वाचा > ढोंगीबाबाचा कारनामा! आधी खड्याचा केला रुद्राक्ष अन् नंतर केले असे काही; रवानगी थेट पोलिस ठाण्यातच
तक्रारीसाठी पोर्टल
फसलेल्या ग्राहकांना https://sachet.rbi.org.in या संकेतस्थळावर तक्रार करता येणार आहे. तसेच http://cms.rbi.org.in या संकेतस्थळावरून माहिती मिळविणे शक्य आहे.
हेही वाचा > ऐनसंक्रांतीच्या सणाला घरावर ओढावली 'संक्रांत'; लेकाला उराशी धरुन मातेचा जीवघेणा आक्रोश