''नाशिकच्या युवकांची 'लॅब डोअर' संकल्पना कोरोना काळात अत्यंत उपयुक्त ठरेल''

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 जुलै 2020

नाशिक शहर व परिसरातील नागरिकांसाठी संकेतस्थळ माध्यमातून घरपोच पॅथलॅब सुविधा मिळाव्यात यासाठी सदर संकल्पनेला सुरुवात केली आहे. हे तरुण सकाळी ६ वाजेपासून सॅम्पल गोळा करण्यास सुरुवात करणार असल्याने सर्वसामान्यांना याचा अधिक फायदा होईल.

नाशिक : नाशिकच्या युवकांनी पुढे येऊन सुरू केलेली 'घरपोच पॅथलॅब' संकल्पना कोरोना संकटाच्या काळात नागरिकांसाठी अत्यंत उपयोगी ठरेल असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. 

सर्वसामान्यांना होणार अधिक फायदा

लॅब डोअर या नाविन्यपूर्ण संकल्पनेचे आज पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी भुजबळ फार्म येथून ऑनलाईन उद्घाटन केले. यावेळी येवला पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, मराठा उद्योजक लॉबीचे संचालक चिंतेश्वर देवरे, डॉ. मंजुश्री घाटी, मच्छिंद्र शेलार, प्रवीण पवार, संतोष जायभावे संचालक राहुल निकम व अजय शेलार यावेळी ऑनलाईन उपस्थित होते. यावेळी श्री. भुजबळ म्हणाले की, राहुल निकम व अजय शेलार या दोन युवकांनी एकत्र येऊन मुंबई व दिल्लीनंतर नाशिकमध्ये प्रथमच अशा संकल्पनेला सुरुवात केली आहे. नाशिक शहर व परिसरातील नागरिकांसाठी संकेतस्थळ माध्यमातून घरपोच पॅथलॅब सुविधा मिळाव्यात यासाठी सदर संकल्पनेला सुरुवात केली आहे. हे तरुण सकाळी ६ वाजेपासून सॅम्पल गोळा करण्यास सुरुवात करणार असल्याने सर्वसामान्यांना याचा अधिक फायदा होईल. तसेच या चाचणीचा अहवाल त्या रुग्णाला त्याच्या घरी ईमेल तसेच व्हाट्सएपच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. 

हेही वाचा > खून झालेल्या युवकावर बलात्काराचा गुन्हा..? युवती गर्भवती राहिल्याने झाला खुलासा

विशेष म्हणजे यासाठी दरही कमी ठेवण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा फायदा मिळेल आणि ज्यांत लक्षण जाणवत नाही अशा काही आजारांचे देखील निदान या चाचणी अहवालातून होणार असल्याचेही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले. सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना या चाचण्या मार्गदर्शक म्हणून काम करतील. www.arlabdoors.com या संकेतस्थळावर नोंदणी करून घरपोच सेवा मिळवून आपल्या आरोग्यासंदर्भात असलेल्या सर्व चाचण्या करवून घेण्याचे आवाहन पालकमंत्री श्री भुजबळ यांनी यावेळी केले.

हेही वाचा > ‘आम्ही पोलिस आहोत’ असा विश्वास दाखवला..अन् निवृत्त एसटी कर्मचाऱ्यासोबत केले असे..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The concept of 'Lab Door' of Nashik youth will be very useful in Corona period - chhagan bhujbal nashik marathi news