esakal | ‘आम्ही पोलिस आहोत’ असा विश्वास दाखवला..अन् निवृत्त एसटी कर्मचाऱ्यासोबत केले असे..
sakal

बोलून बातमी शोधा

st 123.jpg

बँकेत आरडीचे पैसे भरण्यासाठी जात असताना एनडीसीसी बॅंकेसमोर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी ‘आम्ही पोलिस आहोत’ असे सांगून  निवृत्त एसटी कर्मचाऱ्यासोबत केला धक्कादायक प्रकार

‘आम्ही पोलिस आहोत’ असा विश्वास दाखवला..अन् निवृत्त एसटी कर्मचाऱ्यासोबत केले असे..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक / मालेगाव : बँकेत आरडीचे पैसे भरण्यासाठी जात असताना एनडीसीसी बॅंकेसमोर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी ‘आम्ही पोलिस आहोत’ असे सांगून  निवृत्त एसटी कर्मचाऱ्यासोबत केला धक्कादायक प्रकार

काय घडले नेमके?

मंगळवारी कॅम्प भागात एनडीसीसी बँकेसमोर हा प्रकार घडला. कॅम्प भागातील शंकर चौधरी (वय ६४, रा. एसटी कॉलनी, टीव्ही सेंटरजवळ) बँकेत आरडीचे पैसे भरण्यासाठी जात असताना एनडीसीसी बॅंकेसमोर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी ‘आम्ही पोलिस आहोत’ असे सांगून त्यांचा विश्‍वास संपादन केला. त्यानंतर त्यांंच्या गळ्यातील सोन्याची चेन व अंगठी असे ७२ हजार ५०० रुपयांचे दागिने काढून घेऊन दुचाकीवरून फरारी झाले. श्री. चौधरी यांच्या तक्रारीवरून कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

हेही पाहा > VIDEO : जेव्हा सुनीता ताईंकडून नकळत झाले कोरोनाबाधित मृतदेहावर अंत्यसंस्कार...पाहा थरारक आपबिती.. 

निवृत्त एसटी कर्मचाऱ्याला सत्तर हजारांचा गंडा 

पोलिस असल्याचे भासवून दोघा भामट्यांनी निवृत्त एसटी कर्मचाऱ्याची १५ ग्रॅम सोन्याची चेन व सहा ग्रॅम वजनाची अंगठी असा एकूण ७२ हजार ५०० रुपयांचा ऐवज लांबवत दुचाकीवरून पळ काढला. 

हेही वाचा >ह्रदयद्रावक! पुत्रवियोगाचा धक्का..अवघ्या अर्ध्या तासातच मातेचाही जगाचा निरोप.. गावात हळहळ 

go to top