खून झालेल्या युवकावर बलात्काराचा गुन्हा..? युवती गर्भवती राहिल्याने झाला खुलासा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 11 July 2020

हे प्रकरण ताजे असतानाच शुक्रवारी एका अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली. ज्यामुळे सारेच चक्रावले.  या मुलीने भीतीपोटी घरी काही सांगितले नव्हते. मात्र, या प्रकारानंतर ती गर्भवती राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला.

नाशिक / नांदगाव : हे प्रकरण ताजे असतानाच शुक्रवारी एका अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली. ज्यामुळे सारेच चक्रावले.  या मुलीने भीतीपोटी घरी काही सांगितले नव्हते. मात्र, या प्रकारानंतर ती गर्भवती राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला.

काय घडले नेमके?

साकोरे (ता. नांदगाव) येथे दहा दिवसांपूर्वी खून झालेल्या तरुणाविरुद्ध शुक्रवारी (ता. १०) एका अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. विजय शिंदे असे या तरुणाचे नाव असून, गेल्या ३० जूनला त्याचा चाकूने खून करण्यात आला होता. एका मुलीला पळवून नेले, मात्र तिच्याशी विवाह केला नसल्याने, संबंधित मुलीच्या परिवारातील तिघांनी त्याचा खून केल्याचे तपासात पुढे आले होते. हे प्रकरण ताजे असतानाच शुक्रवारी एका अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली असून, विजयने गेल्या मार्चमध्ये शिलाई मशिन दुरुस्त करून देण्याच्या बहाण्याने तिच्यावर बलात्कार केला. तसेच नंतरही दोन वेळा जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

हेही पाहा > VIDEO : जेव्हा सुनीता ताईंकडून नकळत झाले कोरोनाबाधित मृतदेहावर अंत्यसंस्कार...पाहा थरारक आपबिती.. 

ती गर्भवती राहिल्याने हा प्रकार उघडकीस

या मुलीने भीतीपोटी घरी काही सांगितले नव्हते. मात्र, या प्रकारानंतर ती गर्भवती राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी नांदगाव पोलिसांनी मृत विजय शिंदे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक पाटील तपास करत आहेत.  

हेही वाचा >ह्रदयद्रावक! पुत्रवियोगाचा धक्का..अवघ्या अर्ध्या तासातच मातेचाही जगाचा निरोप.. गावात हळहळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crime filed against died murdered youth boy nashik marathi news