esakal | कसारा घाटात केमिकलचा कंटेनर उलटला; केमिकल बाहेर आल्याने वाहनचालकांमध्ये भीती, वाहतूक ठप्प 
sakal

बोलून बातमी शोधा

kasara ghat acc.jpg

कंटेनरमधील रसायन बाहेर आल्याने वाहनचालकांमध्ये भीती पसरल्याने काही काळ वाहतूक बंद झाली.

कसारा घाटात केमिकलचा कंटेनर उलटला; केमिकल बाहेर आल्याने वाहनचालकांमध्ये भीती, वाहतूक ठप्प 

sakal_logo
By
पोपट गवांदे

इगतपुरी (जि.नाशिक) : मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा घाटात मंगळवारी (ता.२०) रसायनाने भरलेला कंटेनर उलटल्याने घाटात काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

कंटेनर उलटल्याने कसारा घाटात वाहतूक ठप्प 

मुंबईहून नाशिककडे येणारा कंटनेर (एमएच २३, एयू ३४७९) जुन्या कसारा घाटातील हिवाळा पॉईंटजवळच्या वळणावर मंगळवारी दुपारी चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटला. या अपघातात चालक युवराज भगवान मिसाळ (रा. बीड) हा किरकोळ जखमी झाला. घोटी टोल पेट्रोलिंगचे कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेऊन कंटेनर चालकाला इगतपुरीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविले. कंटेनरमधील रसायन बाहेर आल्याने वाहनचालकांमध्ये भीती पसरल्याने काही काळ वाहतूक बंद झाली. पोलिसांच्या सहाय्याने वाहतूक एक लेनने सुरू केली.  

हेही वाचा > क्रूर नियती! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीभक्ताचा दुर्देवी अंत; कुटुंबियांचा आक्रोश

हेही वाचा > मध्यरात्रीस खेळ चाले! गायींना भुलीचे औषध देऊन तस्करी; महागड्या गाड्यांचा वापर