वसाका कराराची प्रत सहाय्यक आयुक्तांकडे सुपूर्द; कामगारांत समाधानाचे वातावरण

मोठाभाऊ पगार
Monday, 14 September 2020

धाराशिव साखर कारखाना युनिट- २ संचालित वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्यामधील कामगार संघटना व उद्योगसमूह यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराची प्रत सहाय्यक आयुक्त शिर्के यांना देण्यात आली.

नाशिक : (देवळा) धाराशिव साखर कारखाना युनिट- २ संचालित वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्यामधील कामगार संघटना व उद्योगसमूह यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराची प्रत सहाय्यक आयुक्त शिर्के यांना देण्यात आली. यामुळे या करारावर आता शिक्कामोर्तब झाले असून, तशी मान्यता मिळवत रीतसर कामगार उपायुक्त कार्यालयात नोंदणी करण्यात आली. 

कराराच्या नोंदीमुळे कामगार समाधानी

धाराशिव कारखान्याचे संचालक आबासाहेब खारे, संतोष कांबळे, संदीप खारे, कामगार युनियनचे अध्यक्ष अशोक देवरे, कार्याध्यक्ष कुबेर जाधव, उपाध्यक्ष वसंत पगार आदी उपस्थित होते. धाराशिव उद्योगसमूहाला वसाका भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी दिला असून, दोन वर्षांपासून कराराअभावी हा कारखाना बंद पाडण्यात आला होता. परंतु बुधवारी (ता. ९) यावर तोडगा काढत धाराशिव उद्योगसमूह व कामगार यांच्यात सामंजस्य करार झाल्याने शुक्रवार (ता.११)पासून कामगार कामावर हजर झाले आहेत. कामगार उपायुक्त कार्यालयात या कराराची नोंद झाल्याने कामगारांनी समाधान व्यक्त केले. 

हेही वाचा > धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश

हेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Copy of Vasaka Agreement handed over to Assistant Commissioner nashik marathi news