
कोरोनाने मृत्यू झालेल्या वृद्धाचा मृतदेह रुग्णालयातून नातेवाइकांना घेऊन जाण्यास सांगण्यात आल्याचा प्रकार गुरुवारी (ता. ३) डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात घडला. याबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत वैद्यकीय अधीक्षकांनी रुग्णालयप्रमुखांकडून लेखी स्वरूपात खुलासा मागविला आहे.
नाशिक : कोरोनाने मृत्यू झालेल्या वृद्धाचा मृतदेह रुग्णालयातून नातेवाइकांना घेऊन जाण्यास सांगण्यात आल्याचा प्रकार गुरुवारी (ता. ३) डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात घडला. याबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत वैद्यकीय अधीक्षकांनी रुग्णालयप्रमुखांकडून लेखी स्वरूपात खुलासा मागविला आहे.
कोरोनाबाधिताचा मृतदेह नेल्याप्रकरणी चौकशी सुरू
चांदवड येथील विमल सोनवणे (वय ६५) यांना कोरोनाची लागण झाल्याने महापालिकेच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला. कोरोनाबाधिताचा मृतदेह रुग्णालयातील कर्मचारी आवश्यक ती काळजी घेत अमरधामपर्यंत पोचवितात. अन्य कुणास लागण होऊ नये, याची पुरेपूर काळजी घेतली जाते. असे असताना संबंधित वृद्ध महिलेचा मृतदेह कर्मचारी नसल्याने सहा तास वॉर्डात पडून होता. त्यानंतर सकाळी नातेवाईक आले असता, त्यांनाच रुग्णालयातून मृतदेह काढून नेण्यास सांगण्यात आल्याचा प्रकार घडला.
लेखी स्वरूपातील अहवाल सादर करण्याच्या सूचना
शुक्रवारी (ता. ४) ‘सकाळ’मध्ये वृत्त आल्यानंतर महापालिका वैद्यकीय अधीक्षकांनी दखल घेत चौकशी सुरू केली आहे. रुग्णालयात काय प्रकार घडला आहे, कुणी नातेवाइकांनी मृतदेह घेऊन जाण्यास सांगितले, याचा सविस्तर लेखी स्वरूपातील अहवाल रुग्णालयप्रमुखांनी सादर करण्याच्या सूचना वैद्यकीय अधीक्षकांनी दिल्या.
हेही वाचा > गोणीतून चिमुरड्याचा आवाज येताच ते थबकले...अमानवीय घटनेने नागरिकांत संताप\
संपादन - ज्योती देवरे